सातारा : कराडमध्ये भीषण अपघात; शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले… कंटेनरच्या भरधाव वेगानं होत्याचं नव्हतं झालं
Satara Accident : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर, कोल्हापूर नाका परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात मोटारसायकलसह चालकाच्या शरीराचे तुकडे झालेत. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भरधाव वेगाने मोटारसायकलला कंटेनरने धडक दिली
रस्त्यावर शरीराचे तुकडे पसरले
Satara Accident : सकलेन मुलानी - सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर, कोल्हापूर नाका परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात मोटारसायकलसह चालकाच्या शरीराते तुकडे झालेत. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव बापू भोसले (वय 48) असे आहे.
हे ही वाचा : संगमनेर : पाचवीतील चिमुरडीवर अॅसिड हल्ला, पीडितेचा चेहरा भाजला, वेदनेनं व्हिवळू लागली चिमुकली
भरधाव वेगाने मोटारसायकलला कंटेनरने धडक दिली, रस्त्यावर शरीराचे तुकडे पसरले
घडलेल्या घटनेनुसार, बापू भोसले हे आपल्या मोटारसायकलवरून घरी निघाले होते. पण वाटेतच मागून भरधाव वेगाने कंटेनर आला आणि त्याने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चुराडा होऊन चालकाच्या शरीराचा चेंदामेंदा झाल्याचे वृत्त आहे. अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावर शरीराचे तुकडे पसरले होते.
महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे अपघात
या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा शहारे आले. दरम्यान, कोल्हापूर नाका परिसरात सुरु असलेल्या महामार्गाच्या रुंदीकरण कामामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे वारंवार समोर येत आहे.
हे ही वाचा : LPG Gas Cylinder : घर बसल्या मिळवा सिलेंडर, रांग वैगरे लावायची नाही.. फक्त करा 'एकच' गोष्ट
निष्काळजीपणा, तुफान वेगामुळे आजपर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये संताप आहे.










