अदानी, अंबानींपासून ते मोहन भागवतांपर्यंत; रेवती सुळेंच्या लग्नाला कोणा-कोणाची हजेरी?
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह सोहळा मुंबईमध्ये पार पडला. या सोहळ्याला देशभरातील दिग्गज नेते, सेलिब्रिटी यांनी हजेरी लावली आहे. जाणून घ्या, या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अदानी, अंबानींपासून ते मोहन भागवतांपर्यंत
रेवती सुळेंच्या लग्नाला कोणा-कोणाची हजेरी?
Revati Sule Wedding : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे नामवंत उद्योगपती सारंग लखानी विवाहबंधनात अडकले. मुंबईत पार पडलेल्या या हाय-प्रोफाइल विवाह सोहळ्यात राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि नामांकित उद्योगपतींनी हजेरी लावली. पवार कुटुंबातील या कौटुंबिक सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दिग्गजांची उपस्थिती
या विवाह सोहळ्याला देशाच्या राजकीय पटलावरील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री, ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश होता, त्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छी दिल्या. याशिवाय उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि संजय राऊत हे आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. तर महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री आणि खासदार-आमदार उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, पंकजा मुंडे यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
हे ही वाचा : पुणे : भुयारी मार्ग, उच्चभ्रू महिलांशी शारीरिक संबंध, कंडोम्स अन् गोळ्या
शाहरुख खानने गाजवला संगीत सोहळा
लग्नाआधी आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार 'संगीत' सोहळ्यात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने विशेष उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मुख्य विवाह सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन, रणबीर कपूर, दिग्दर्शक करण जोहर, जावेद अख्तर, फरहान अख्तर, बोनी कपूर, चंकी पांडे आणि रवी किशन यांसारख्या सिनेसृष्टीतील नामांकित कलाकारांनी हजेरी लावली. तसेच उद्योग जगतातून रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी व नीता अंबानी, अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी, अदानी समूहाचे गौतम अदानी व प्रीती अदानी आणि सायरस पूनावाला समूहाचे आदर पूनावाला यांसारख्या बड्या उद्योगपतींनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, छत्री विसरु नका! पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह...
कोण आहेत सारंग लखानी?
रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन' (लोकप्रशासन) मध्ये पदव्युत्तर (मास्टर्स) पदवी घेतली आहे. तर त्यांचे पती सारंग लखानी हे नागपूरच्या प्रसिद्ध 'विश्वरज' (Vishvaraj) बिझनेस ग्रुपचे कार्यकारी संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) म्हणून धुरा सांभाळत आहेत. सारंग यांचे वडील अरुण लखानी हे विश्वरज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) असून, नुकतीच त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित अशा या दोन्ही कुटुंबांचा हा विवाह सोहळा कौतुकाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.









