'षडयंत्र रचणारे कोण? मी नंतर बोलेन..', राणाजगजीतसिंह पाटील काय म्हणाले?
Ranajagjitsinha Patil : डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 8 आरोपींची निर्दोषपणे सुटका केली. अशातच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी याबाबत अनेक दावे केले, याचवेळी नातू मल्हार पाटील आणि मेघ पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते. या घटनेला 20 वर्षे पूर्ण झाली होती. गेली 17 वर्षांपासून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती, न्यायदेवतेवर आमचा सुरूवातीपासूनच विश्वास होता. न्याय मिळाला याचा आनंद आहेत, गेली 17 वर्षे सर्व काही सहन करावं लागलं आता काही गोष्टी लवकरच समोर येतील, अशी प्रतिक्रिया राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
''1990 साली डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्यमंत्री होणार होते''
खटल्याला 17 वर्षे का लागली?
Ranajagjitsinha Patil : गणेश जाधव - पवनराजे आणि चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने आज सुनावणी केली. या सुनावणीत न्यायालयाने डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 8 आरोपींची निर्दोषपणे सुटका केली. अशातच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी याबाबत अनेक दावे केले, याचवेळी नातू मल्हार पाटील आणि मेघ पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते. या घटनेला 20 वर्षे पूर्ण झाली होती. गेली 17 वर्षांपासून कायदेशीर प्रक्रिया सुरू होती, न्यायदेवतेवर आमचा सुरूवातीपासूनच विश्वास होता. न्याय मिळाला याचा आनंद आहेत, गेली 17 वर्षे सर्व काही सहन करावं लागलं आता काही गोष्टी लवकरच समोर येतील, अशी प्रतिक्रिया राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली.
हे ही वाचा : 12 वर्षाच्या लेकासमोर आईवरच लैंगिक अत्याचार, नंतर..
''1990 साली डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्यमंत्री होणार होते''
डॉ. पाटील यांना काय झालं आहे हे मी समजावून सांगू शकत नाही आणि ते कळणार देखील नाही, अशी त्यांची वैद्यकीय स्थिती आहे, हीच वैद्यकीय स्थिती उद्भवली कशी, हे एकूण षडयंत्र कोणी आणि का केले यात कोण कोण प्यादे होते. 1990 साली डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्यमंत्री होणार होते, तसा त्यांचा शब्द होता. मात्र ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कॅबिनेटचा विस्तार होणार होता त्याच काळातील हे षडयंत्र रचण्यात आले होते.
खटल्याला 17 वर्षे का लागली?
षडयंत्र रचणारे कोण याबाबत मी नंतर बोलेन, काही लोकांनी चुकीची विधाने देखील केली आहेत. न्याय प्रविष्ट असल्याने यावर आतापर्यंत काहीही बोललो नाही, पण याचाच राजकीय फायदा घेतला गेला. अतिशय चुकीच्या पद्धतीने विधाने देखील केली होती. योग्य वेळी याबाबत बोलेन, असे आमदार पाटील म्हणाले. या खटल्याला आता 17 वर्षे का लागली? हे लवकरच सांगेन.
केवळ धाराशिवच नाही,तर राज्याच्या राजकारणातून डॉ. पाटील यांना अडकवण्यात आले होते. याबाबत अभ्यास करा, वेळ आल्यावर मी नक्की बोलेन. पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी केली. याची कारण काय, ही आमची मागणी असणार आहे. अनेक बाबी कोर्टासमोर आलेल्या असून प्रकरणाचा योग्य तपास झाला असून आरोपी कोण हे निदर्शनास येईल, असा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले.
