'तुमची लायकी दिल्लीहून येणारे आदेश पाळण्यापुरतीच, उठ म्हटलं की...', काँग्रेसची शिंदेंवर भयंकर जहरी टीका
महाराष्ट्र काँग्रेसने एकनाथ शिंदेंवर जोरदार आणि जहरी स्वरूपाची टीका केली आहे. 'एक्स'वर केले पोस्टमधून काँग्रेसने शिंदेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने अत्यंत आक्रमक आणि जहरी शब्दात टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील एका विस्तृत पोस्टमधून काँग्रेसने शिंदेंच्या राजकारणावर, त्यांच्या भाजपसोबतच्या युतीवर आणि त्यांच्या नेतृत्वशैलीवर थेट निशाणा साधला आहे.
"आधी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना उभी करा"
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची काँग्रेस होईल का याची चिंता करण्याऐवजी आधी बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली शिवसेना उभी करून दाखवावी. काँग्रेसने असा आरोप केला की, शिवसेना आणि तिच्या विचारसरणीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार शिंदे यांनी गमावला आहे.
हे ही वाचा>> 'शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही..' वर्धापन दिनानिमित्त शिंदेसेनेचा खास टीझर बघितला का?
काँग्रेसच्या इतिहासाचा दाखला
पोस्टमध्ये काँग्रेसने आपल्या ऐतिहासिक वारशाचाही उल्लेख केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीतील भूमिका आणि महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांचा वारसा काँग्रेसकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेसने असा दावा केला की, "काँग्रेस होण्यासाठी त्याग, संघर्ष आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची परंपरा लागते. कोणताही भेदभाव न करता माणसाला माणसाशी जोडणारे राजकारण करण्याची क्षमता लागते."









