Big Breaking: पक्षप्रमुख पद सोडण्याबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, शिवसेना UBT च्या मेळाव्यातील हायव्होल्टेज बातमी

शिवसेना UBT पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पद सोडण्याबाबत विधान केलं आहे. पाहा नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे.

ADVERTISEMENT

operation tiger inside story of how eknath shinde succeeded within mahayuti where did uddhav thackeray let his guard down
Operation Tiger
Google CTA

मुंबई: शिवसेना UBT पक्षाने आज आपला 60 वा वर्धापन दिन साजरा केला. दोनच दिवसांपूर्वी ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार आणि एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर.. या पार्श्वभूमीवर शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान, आपल्या भाषणात त्यांनी थेट पक्षप्रमुख पद सोडण्याचं विधान केलं. ज्यामुळे सभागृहातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पद सोडण्याबाबत नेमकं काय म्हणाले? जसंच्या तसं...

'प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे हे कोणालाच माहिती नाही. माहिती असतील कसे. कारण जसा कोरोना आला होता तसा त्यावेळेस प्लेग आला होता. तेव्हा आमचं घराणं पनवेलमध्ये राहायचं. प्लेग म्हणजे काय.. लागला की गेला.. म्हणजे कोणाला गाठ आली की गेलाच.'

'पण मृतदेह वाहून न्यायला कोणाची तयारी नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या मित्र-मंडळींनी हे सगळं मृतदेह वाहण्याचे काम केलं. त्याच्यात प्लेग होऊन गेले.. आहे असा कुणाच्या घराण्याचा इतिहास? आमच्या अंगावर इथे येता?'

हे ही वाचा>> Operation Tiger: महायुतीत एकनाथ शिंदे कसे झाले यशस्वी त्याची Inside Story.. उद्धव ठाकरे कुठे राहिले गाफील?

'म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय.. तुम्ही मला आजपर्यंत जपलं.. कारण शिवसेनाप्रमुखांचा आदेश.. जसं शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की, तुम्ही मला जपलं, तसं उद्धवला सांभाळा.. आदित्यला सांभाळा.. तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे ते तुम्हाला माहितीए.'

'माझ्या माणसांनी माझ्यावर बोट दाखवलं तर एक क्षण देखील मी तिकडे राहणार नाही. म्हणून मी मुख्यमंत्री पद सोडलं आणि वर्षा सोडून मातोश्रीवर गेलो. त्यामुळे नाटक म्हणून मला जमलेलं नाही आणि करण्याची गरज नाही.'

हे ही वाचा>> 6 खासदार फुटल्यानंतर आदित्य ठाकरे संतापले, काय म्हणाले?

'मला जर काही पाहिजे, असतं तर आजसुद्धा मी विनासायास विधानपरिषदेत टिकोजीरावांसारखा जाऊन बसलो असतो. पण मी गेलो नाही. म्हणून मी तुम्हाला आज विचारतोय.. विचार करून उत्तर द्या.'

'60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावर होत आहेत ते जर खरे वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं मी आता या पदावरून पायउतार व्हायला तयार आहे.'

'फक्त माझी एक अटक आहे.. ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या, दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या.. तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल. मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची हाव नाही.. मी आता हे पद सोडायला तयार आहे.'

'पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त.. रक्ताचा माणूस माझ्यावर आरोप करत असेल. तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाही. मी खचणार नाही.. अनेक संकटं आली पण मी पळणारा नाहीए. मी पहाडासारखा उभा राहीन.. जबाबदारी स्वीकारेन.. तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्याक्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.