पुण्यातील संदीप हॉटेलवर आयकर विभागाची छापेमारी, जाणून घ्या कारवाईचा संपूर्ण तपशील

पुणे आणि अहिल्यानगरमधील संदीप उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. 14 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कारवाईत हॉटेल्स, व्यावसायिक ठिकाणे आणि काही निवासस्थानांची तपासणी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

ADVERTISEMENT

Hotel Sandeep Income Tax Raids
Hotel Sandeep Income Tax Raids
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोतकर कुटुंबीयांशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाची छापेमारी

point

नेमकं कारण काय?

Hotel Sandeep Income Tax Raids : अहिल्यानगर आणि पुण्यातील चर्चित कोतकर कुटुंबीयांच्या विविध व्यावसायिक आणि राजकीय ठिकाणांवर आयकर विभागाने (Income Tax Department) मोठी छापेमारी सुरू केली आहे. पुणे, मुंबई आणि नगरमधील जवळपास 15 ते 20 ठिकाणांवर हे धाडसत्र सुरू असून, हॉटेल व्यवसाय, रिअल इस्टेट आणि एव्हिएशन क्षेत्रातील आर्थिक उलाढालींवर आयकर अधिकारी कसून चौकशी करत आहेत. हॉटेलमधील खपाचे रेकॉर्ड, करचोरीचे आरोप आणि उत्पन्नाचे स्रोत तपासण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.

हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर...

माजी महापौर आणि कोतकर कुटुंबीयांनी गेल्या काही वर्षांत राजकारणापेक्षा व्यावसायिक विस्तारावर अधिक भर दिला आहे. पुण्यातील जेम रोडसह विविध भागांत सुरू असलेली त्यांची मटण हॉटेल्स खाद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. व्यवसायाचा आवाका वाढवत त्यांनी नुकतीच हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहिती आणि सोशल मीडियावरील रील समोर आल्यानंतर, या वाढत्या संपत्तीच्या स्त्रोताबाबत आयकर विभागाची पावले अधिक वेगवान झाली.

हे ही वाचा : निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा इशारा! 'फालतू बहाणे नको' पुरावे गायब कसे झाले?

'त्या' गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा

या कुटुंबाची पार्श्वभूमी जुन्या राजकीय आणि गंभीर गुन्हेगारी प्रकरणांशी जोडलेली राहिली आहे. 2008 मधील अशोक लांडगे हत्या प्रकरण असो वा 2018 मधील केडगाव येथील गाजलेले दुहेरी हत्याकांड (वसंत ठुबे आणि संजय कोतकर खून), या दोन्ही प्रकरणांत माजी महापौर संदीप कोतकर आणि त्याच्या कुटुंबीयांची नावे समोर आली होती. या गुन्ह्यांमध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर सध्या हे आरोपी जामिनावर बाहेर आहेत.

हे ही वाचा : CJP च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी, नेहा बोरा बोलत असताना काय घडलं? दिपकेंनी चांगलंच सुनावलं!

दोन ते तीन दिवस छापेमारी

राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीतून व्यावसायिक क्षेत्राकडे वळलेल्या कोतकर कुटुंबीयांचा हा व्यवसाय आणि संपत्तीचा विस्तार आता इन्कम टॅक्सच्या रडारवर आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवरील ऐतिहासिक दबदबा, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आणि नवीन एव्हिएशन व्यवसायाची कागदपत्रे आयकर विभागाकडून तपासली जात आहेत. पुढील दोन ते तीन दिवस ही छापेमारी चालण्याची शक्यता असून, त्यानंतर या कारवाईची अधिकृत माहिती स्पष्ट होईल.