शिवसेनेच्या 6 खासदारांना Y प्लस दर्जाची सुरक्षा

मुंबई तक

राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांना तातडीने संदेश पाठवून बंडखोर खासदारांना वाढीव सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

google news

राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांना तातडीने संदेश पाठवून बंडखोर खासदारांना वाढीव सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली. सुरक्षा देण्यात आलेल्या खासदारांमध्ये यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, तसेच मुंबई उत्तर-पूर्णचे खासदार संजय दिना पाटील, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे या खासदारांचा समावेश आहे.

गृह विभागाच्या पत्राद्वारे पोलिसांना सहा खासदारांसाठी खास सुरक्षा दिली जाणार असल्याची माहिती आहे. सुरक्षा समितीने प्रादेशिक परिस्थिती आणि संभाव्य धोका लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. या खासदारांच्या कार्यक्षेत्रात स्थानिक पोलिसांच्या निरीक्षणात वाढ होईल. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयाने योग्य सूचना दिल्या आहेत.

 

हे वाचलं का?