शिक्षिका बँक मॅनेजरसोबत आक्षेपार्ह स्थितीत, 6 वर्षीय मुलानं पाहिलं अन्..
Crime News : सहा वर्षीय मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अनैतिक संबंधांत अडथळा ठरल्यामुळे प्रियकरानेच मुलाचा गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षिका बँक मॅनेजरसोबत आक्षेपार्ह स्थितीत
6 वर्षीय मुलानं पाहिलं अन्..
Crime News : सहा वर्षीय अंगदवीरच्या अपहरण आणि हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्पित पाराशर याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर त्याच्या कबुलीजबाबातून अंगदवीरचा मृतदेह भद्रकाली जंगलातील झुडपांतून सापडला. आरोपीने गळा चिरून निष्पाप बालकाची हत्या केल्याची कबुली दिली असून, या प्रकरणात मुलाची आई गुरप्रीत कौर हिचाही सहभाग असल्याचा संशय असल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने माणुसकीला काळीमा फासली असून गावकरी आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत.
हेही वाचा : सोलापूर : जेलमधून थेट मतदानासाठी, न्यायालयाचीही परवानगी, शालन शिंदे आहेत तरी कोण?
आईला आणि अर्पितला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले अन्...
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अर्पित पाराशर हा हापूरमधील एका बँकेत एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत होता आणि अंगदवीरची आई गुरप्रीत कौर एका खासगी शाळेत शिक्षिका होती. प्रवासादरम्यान त्यांची ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोन दिवसांपूर्वी अंगदवीरने आपल्या आईला आणि अर्पितला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. स्वतःची बदनामी होईल या भीतीपोटी अर्पितने अंगदवीरला वाटेतून हटवण्याचा क्रूर कट रचला. मंगळवारी अर्पितने अंगदवीरला कारमध्ये बसवून फसवून नेले आणि भद्रकाली जंगलातील सती माता मंदिराच्या जवळ नेऊन त्याची गळा चिरून हत्या केली.
हेही वाचा : खासदारानंतर आता ठाकरेंचे आमदार फुटणारच, भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ









