Personal Finance: महिन्याच्या पहिल्या 7 दिवसांत करा हे 7 आर्थिक निर्णय, तरच...
Financal Decisions: महिन्याच्या सुरुवातीलाच घेतलेले काही आर्थिक निर्णय तुमची बचत, गुंतवणूक आणि आर्थिक शिस्त मजबूत करू शकतात. पहिल्या 7 दिवसांत कोणती 7 महत्त्वाची आर्थिक कामे करावीत, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Personal Finance (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: चॅटजीपीटी)
▌
बातम्या हायलाइट
महिन्याचे बजेट पहिल्याच आठवड्यात तयार करा
मागील महिन्याच्या खर्चाचा हिशोब करा
प्रत्येक महिन्यासाठी एक आर्थिक लक्ष्य ठेवा
Personal Finance tips for financal decisions: महिन्याचा पहिला आठवडा हा केवळ पगार खात्यात जमा होण्याचा काळ नसतो, तर आर्थिक नियोजनाची सर्वात महत्त्वाची संधी असते. अनेक जण महिन्याच्या सुरुवातीलाच अनावश्यक खर्च करून नंतर पैशांची कमतरता जाणवू लागते. मात्र, जर पहिल्या 7 दिवसांत काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले, तर बचत वाढते, गुंतवणूक नियमित राहते आणि आर्थिक तणाव कमी होतो.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खालील सात गोष्टी करण्याची सवय लावल्यास दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळू शकते.
1. सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या (Pay Yourself First)
पगार मिळाल्यानंतर सर्वात आधी बचत आणि गुंतवणुकीसाठी रक्कम बाजूला काढा.
काय केलं पाहिजे?
