Maharashtra Weather : राज्यात वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामानात बदल घडल्याची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या 7 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवमान.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊसाचा अंदाज

point

7 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील हवामानात काही प्रमाणात बदल घडताना दिसून येतो. कुठे ऑरेंज तर कुठे हवामानाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशातच जाणून घ्या 7 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

हे ही वाचा : हॉलिवूड क्राईम सीरीज पाहून नवऱ्याने बायकोला तलवारीनं संपवलं, आत्महत्येचा रचला बनाव

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. जळगावमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नाशिक, आणि नाशिक घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे.