सोलापूर : जेलमधून थेट मतदानासाठी, न्यायालयाचीही परवानगी, शालन शिंदे आहेत तरी कोण?
Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका शालन शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील आरोपी असूनही, न्यायालयाच्या विशेष परवानगीने कडेकोट पोलीस बंदोबस्तात विधान परिषदेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर : जेलमधून थेट मतदानासाठी,
न्यायालयाचीही परवानगी, शालन शिंदे आहेत तरी कोण?
Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक अत्यंत लक्षवेधी घडामोड समोर आली. मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील आरोपी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका शालन शिंदे यांनी तुरुंगातून थेट मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा : ठाणे : बायकोवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, अन् भयंकर घडलं, डॉक्टर पतीला अटक
मनसेचे पदाधिकाऱ्याची हत्या अन् शालन शिंदे तुरुंगात
शिंदे आणि सरवदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात गेल्या सहा महिन्यांपासून त्या या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचे असल्याने त्यांनी न्यायालयाकडे विशेष विनंती अर्ज केला होता. त्यांच्या या मागणीची दखल घेत न्यायालयाने त्यांना केवळ मतदानासाठी ही विशेष परवानगी दिली.
हेही वाचा : ठाणे : बायकोवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, अन् भयंकर घडलं, डॉक्टर पतीला अटक









