'याद तेरी बन गई..', घटस्फोटीत म्हणाला आपण पुन्हा एक होऊ, रील शूट केलं अन् थेट मर्डर

मुंबई तक

punjab crime news : समेट करुन घेण्याच्या बहाण्याने भेटायला बोलावलेल्या घटस्फोटीत पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात उघडकीस आली. हत्येपूर्वी दोघांचा एक इन्स्टाग्राम रीलही समोर आला असून, त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'याद तेरी बन गई..',

point

घटस्फोटीत म्हणाला आपण पुन्हा एक होऊ

point

रील शूट केलं अन् थेट मर्डर

Panjab Crime News : पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जंडवाला मीरा सांगला गावात एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झालेल्या पत्नीला पुन्हा एकत्र राहण्याचे आश्वासन देत भेटीसाठी बोलावून तिची हत्या केल्याचा आरोप माजी पतीवर आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत, राज ठाकरेंनी सगळंच काढलं

मृतदेह खड्ड्यात पुरला अन् पुरावे नष्ट; पण गावकऱ्यांमुळे ट्वीस्ट 

मृत महिलेची ओळख 42 वर्षीय सरोज अशी झाली आहे. घटस्फोटानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरमीत सिंग याने सरोजला पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि भेटण्यासाठी बोलावले. भेटीनंतर त्याने तिला झुडपांजवळील एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा : 'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी...' अमित शहांचा देशातील तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?