रक्ताने माखलेला चाकू, बेडवर पत्नीचा मृतदेह, सनकी पती तिथेच बसला अन्...
Crime News ratlam : रतलाममध्ये पतीने पत्नीची धारदार चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून हत्येचे कारण शोधले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रक्ताने माखलेला चाकू, बेडवर पत्नीचा मृतदेह
सनकी पती तिथेच बसला अन्...
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. माणक चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुनार बावडी परिसरात एका तरुणाने आपल्या पत्नीची धारदार चाकूने गळा चिरून हत्या केल्याचं समोर आलंय. या घटनेनंतरही आरोपी तेथून पळून गेला नाही. उलट रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन तो पत्नीच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
हेही वाचा : 'माझे वहिनीसोबत अनैतिक संबंध...' चुलत भावांमध्ये दोन वर्ष वाद, शेवटी काय घडलं?
आरोपीचा आक्रमक पवित्रा पाहून शेजारी घाबरले...
घटनेच्या वेळी घरात केवळ पती असगर अली, त्याची पत्नी रूकैय्या आणि त्यांची मुले उपस्थित होती. आरोपीचे आई-वडील काही कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. त्याच दरम्यान घरातून महिलेच्या जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारी घटनास्थळी धावले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिले की, पलंगावर महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या हातात चाकू होता आणि तो पत्नीवर वार करत होता. आरोपीचा आक्रमक पवित्रा पाहून शेजारी घाबरले आणि त्यांनी तातडीने घराबाहेर येत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : मुलीने ITBP जवानासोबत प्रेमविवाह केला, बापाने सूड उगवला, काय घडलं?
