मुलीने ITBP जवानासोबत प्रेमविवाह केला, बापाने सूड उगवला, काय घडलं?

मुंबई तक

honour killing : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी 24 वर्षीय मुलीची मारहाण करून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

honour killing
honour killing
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलीने ITBP जवानासोबत प्रेमविवाह केला

point

बापाने सूड उगवला, काय घडलं?

honour killing : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध विवाह केल्याच्या रागातून एका वडिलांनी स्वतःच्या 24 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विमल शर्मा याला अटक करण्यात आली असून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत तरुणीचे नाव अंकिता असून तिने सुमारे चार महिन्यांपूर्वी आयटीबीपीमध्ये कार्यरत असलेल्या अमित पचौरी याच्यासोबत न्यायालयात विवाह केला होता. मात्र या विवाहाला तिच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता.

हेही वाचा : 'राजकीय करिअर तुझं...' मुंडेंवर घणाघात; जरांगेंनी आंदोलनाचा प्लॅनही सांगितला

 स्कार्फच्या साहाय्याने गळा आवळून पोटच्या मुलीचा खून 

पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहानंतर अमित पचौरी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी परतला होता, तर अंकिता आपल्या आई-वडिलांच्या घरीच राहत होती. या विवाहामुळे घरात सातत्याने तणावाचे वातावरण होते. सोमवारी रात्री या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. आरोपी विमल शर्मा याने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर स्कार्फच्या साहाय्याने तिचा गळा आवळला. या संपूर्ण घटनेच्या वेळी त्याची पत्नी आणि मुलगा घरात उपस्थित होते. हत्या केल्यानंतर आरोपीने पत्नी आणि मुलाला घराबाहेर जाण्यास सांगितले आणि स्वतः मृतदेहाजवळ बसून राहिला.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, तरीही 'या' जिल्ह्यांना IMD चा अलर्ट