'ते' भाषण.. ट्रोलिंग आणि अमित ठाकरेंची बेधडक मुलाखत

मुंबई तक

Amit Thackeray exclusive interview : ट्रोलिंग, भाषणादरम्यान घडलेला प्रसंग आणि राजकारणातील प्रामाणिकपणावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत सविस्तर भूमिका मांडली. लोकांनी स्वीकारलं किंवा नाकारलं तरी प्रामाणिकपणा सोडणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

Amit Thackeray exclusive interview
Amit Thackeray exclusive interview
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'ते' भाषण.. ट्रोलिंग आणि विद्यार्थी आंदोलन

point

अमित ठाकरेंची ही बेधडक Exclusive मुलाखत

Amit Thackeray exclusive interview : मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंग, त्यांच्या भाषणानंतर निर्माण झालेली चर्चा आणि राजकारणातील आपल्या भूमिकेबाबत स्पष्टपणे मत व्यक्त केले. भाषणादरम्यान काही क्षण ब्लँक झाल्यामुळे झालेल्या ट्रोलिंगबाबत बोलताना त्यांनी त्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे सांगितले. दोन मिनिटांच्या त्या प्रसंगामुळे जर महाराष्ट्राचे किंवा लोकांचे काही नुकसान झाले असेल तर लोकांनी मला जरूर सांगावे, असे ते म्हणाले. माणसाकडून चुका होतात आणि त्या स्वीकारण्याची ताकद असणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी स्वतःच्या चुकांपासून पळ काढणार नसल्याचे स्पष्ट केले. लोकांनी स्वीकारले किंवा नाकारले तरी आपण त्यांच्यासाठी काम करत राहणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, तरीही 'या' जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

राज ठाकरे यांचा पुत्र नसतो तर राजकारणात आलोच नसतो - अमित ठाकरे

अमित ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. आपण राज ठाकरे यांचा पुत्र नसतो तर राजकारणात आलोच नसतो, हे छातीठोकपणे सांगण्यास आपल्याला कोणतीही भीती नसल्याचे त्यांनी म्हटले. यात काही चुकीचे नसून आपल्याला मिळालेला व्यासपीठ महाराष्ट्रासाठी काम करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वडिलांनी महाराष्ट्रासाठी केलेले कार्य आपण लहानपणापासून पाहिले असून त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. राजकारणात आपली तुलना इतर कोणाशी नव्हे, तर फक्त राज ठाकरे यांच्याशी व्हावी, अशी आपली इच्छा असल्याचे सांगत त्यांच्या दहा टक्के जरी आपण गाठू शकलो तरी ते स्वतःसाठी मोठे यश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा मोठा विजय, भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग