बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा मोठा विजय, भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग

मुंबई तक

Prashant kishor : देशात सध्याचा मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. मात्र, आता याच पक्षाला बिहारच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. बिहारमधील 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपला चांगली धुळ चारली.

ADVERTISEMENT

Prashant kishor
Prashant kishor
Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या बालेकिल्ल्याला प्रशांत किशोरांकडून सुरूंग 

point

प्रशांत किशोर यांचा 18,953 मतांनी दणदणीत विजय

Prashant Kishor : देशात सध्याचा मोठा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. मात्र, आता याच पक्षाला बिहारच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. बिहारमधील 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपला चांगली धुळ चारली. राजकीय रणनीतीच्या कॉर्पोरेट उद्योगातून राजकारणात उडी घेतलेल्या प्रशांत किशोरांचा या निवडणूक निकालामुळे देशाला एक चांगला नेता मिळेल अशी अपेक्षा आहे.    

हे ही वाचा : मामीच्या प्रेमात भाचा वेडा, महिलेनं स्कार्फने गळा आवळत तरुणाला संपवलं

भाजपच्या बालेकिल्ल्याला प्रशांत किशोरांकडून सुरूंग 

बिहारमधील बांकीपूर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्याला आता जनसुराज पक्षाने चांगलंच पाणी पाजलं आहे. काँग्रेसशिवाय भाजपला विरोध करणारा आणखी एक तरुण नेता म्हणून प्रशांत किशोरकडे आजपासून पाहिले जाईल अशी आशा या देशात जन्मली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. प्रशांत किशोर यांचा विजय म्हणजे भाजपच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला लावलेल्या या सुरूंगाचा मोठा परिणाम हा येत्या काही निवडणुकांमध्ये देशभर दिसू शकेल. 

प्रशांत किशोर यांचा 18,953 मतांनी दणदणीत विजय

या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांनी दणदणीत विजय मिळवला. या निकालाची देशभर चर्चा होताना दिसते. नितीन नवीन यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघात आपला गड राखला होता. मात्र आता हा गड उद्ध्वस्त करण्यात प्रशांत किशोर यांना मोठं यश आलंय. 

2010 2010, 2015, 2020 आणि 2025 च्या विधानसभा निवडणुकांत नितीन नवीन विजयी झाले होते. त्याआधी याच भागातून पटना पश्चिम या मतदारसंघाच नितीन नवीन यांचे वडील नबीन किशोर सिन्हा हे 1996 पासून सलग चार वेळा निवडून आले होते. अशातच भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लागल्याची देशभराच चर्चा आहे.