मामीच्या प्रेमात भाचा वेडा, महिलेनं स्कार्फने गळा आवळत तरुणाला संपवलं

मुंबई तक

crime news : मामीच्या प्रेमात भाचा अगदी वेडापिसा झाला होता, मात्र आपल्या मामीच्या प्रेमात पडल्याने भाच्याचा जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाच्याची परिस्थिती पाहून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तोवर उशिर झाल्याने डॉक्टरांनी भाच्याला मृत घोषित केले.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मामीच्या प्रेमात भाचा अगदी वेडापिसा

point

लग्नाची करू लागला मागणी

Crime News : मामीच्या प्रेमात भाचा अगदी वेडापिसा झाला होता, मात्र आपल्या मामीच्या प्रेमात पडल्याने भाच्याचा जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाच्याची परिस्थिती पाहून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तोवर उशिर झाल्याने डॉक्टरांनी भाच्याला मृत घोषित केले होते. ही घटना मध्य प्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यातील मोरवा ठाणे क्षेत्रातील भगत सिंह कॉलनी परिसरातील आहे. आरोपीची ओळख सत्यप्रकाश गुप्ता (वय 28) आणि मामीची प्रिया गुप्ता (वय 35) आशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : चंद्रपुरात पुरूषानं घेतला तंत्र मंत्राचा नआधार, महिलेला शेजारच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं

मामीच्या प्रेमात भाचा अगदी वेडापिसा

सूत्रांनुसार, भाचा सत्यप्रकाश गुप्ताचे आपली मामी प्रिया गुप्ताशी मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही वर्षांपासून दोघांचे नातेसंबंध सुरूच होते. परंतु भाचा हा मामीसोबत विवाह करून तिच्यासोबत कायमस्वरूपी राहण्यास दबाव आणू लागला होता. त्याने जाहीर केलं की, तो तिच्याशिवाय अजिबातच जगू शकत नाही. तिच्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेऊ लागला होता. 

भाच्याच्या रोज त्रासाला कंटाळून रचला भयानक कट 

तर दुसरीकडे आरोपी महिला प्रिया गुप्ता हिला समाजातील लोकांची फार भीती होती. समाजात आपली बदनामी होईल ही तिला चिंता होती. कौटुंबिक अपमानात तिला आपले उर्वरित आयुष्य घालवायचे नव्हते, मृत भाच्याच्या वाढत्या दबावाला आणि रोजच्या लग्नाच्या आग्रहाला कंटाळून महिलेनं नात्याचा वेदनादायक अंत करण्याचा निर्णय घेतला. 

ओढणीने गळा दाबून भाच्याला संपवलं

जेव्हा संबंधित तरुणाचा दबाव असह्य झाला असता, त्या महिलेनं त्याच्याच ओढणीने त्याचा गळा दाबून त्याला ठार मारले होते. ही घटना अपघात वाटावी, यासाठी त्या धूर्त महिलेनं मृतदेह त्याच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवला होता, नंतर मृत्यू हा अपघाताचे कारण असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला होता.