'माझे वहिनीसोबत अनैतिक संबंध...' चुलत भावांमध्ये दोन वर्ष वाद, शेवटी काय घडलं?
राजकोटमध्ये,दोन वर्षांपासूनच्या वादातून आणि वहिनीसोबतच्या कथित अनैतिक संबंधांच्या संशयावरून रक्तरंजित हत्याकांड घडले आहे. 42 वर्षीय घनश्यामसिंह यांची त्यांच्याच चुलत भावाने चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'माझे वहिनीसोबत अनैतिक संबंध...'
चुलत भावांमध्ये दोन वर्ष वाद
शेवटी घडलं भयानक
Crime News : एकेकाळी शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातच्या राजकोटमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. भक्तिनगर परिसरातील जलाराम चौक ते भक्तिनगर सर्कल रस्त्यावरील धर्मजीवन अपार्टमेंटसमोर नुकतीच एक खळबळजनक हत्येची घटना घडली. 42 वर्षीय घनश्यामसिंह वाघेला हे आपल्या कारमध्ये बसलेले असताना, त्यांचा चुलत भाऊ धर्मेंद्रसिंह वाघेला याने त्यांना बाहेर बोलावून चाकूने तब्बल 7 वार केले. गंभीर जखमी झालेल्या घनश्यामसिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भक्तिनगर पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
वहिनीशी अनैतिक संबंध
या हत्येमागे केवळ जुने वैमनस्य नसून कौटुंबिक विवाद आणि अनैतिक संबंधांचा संशय हे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दोन वर्षांपूर्वी नवरात्रीच्या काळात दोन्ही कुटुंबांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता, ज्यामध्ये घनश्यामसिंह आणि त्यांच्या वडिलांवर चाकूने हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच, आरोपीच्या मोठ्या भावाच्या पत्नीशी घनश्यामसिंह यांचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरूनही दोन्ही कुटुंबांत मोठा तणाव होता. या वादातूनच आरोपीच्या भावाने आधीही घनश्यामसिंह यांच्यावर हल्ला केला होता आणि नंतर पत्नीला घटस्फोट दिला होता.
हे ही वाचा : रॅपिडो चालकाचे अश्लील कृत्य, 'तसले' व्हिडिओ पाहताना महिला प्रवाशानं रेड हँड पकडलं
भीतीपोटी घरही बदलले
घटनेच्या आधीच्या घडामोडींवर नजर टाकल्यास हा पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येते. घटनेच्या अवघ्या एक आठवड्यापूर्वी आरोपी धर्मेंद्रसिंह याने गांधीग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये घनश्यामसिंह सतत फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप केला होता. या भीतीपोटी आरोपीने आपले घरही बदलले होते. तसेच, हत्येच्या एक दिवस आधी घनश्यामसिंह यांनी धर्मेंद्रसिंह याला तब्बल 40 ते 50 मिस्ड कॉल्स केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आपल्या एका सहकाऱ्यासह ॲक्टिव्हावरून घनश्यामसिंह यांचा शोध घेत होता आणि अखेर त्यांनी गाठून ही प्राणघातक घटना घडवली.
हे ही वाचा : अभिनेत्री त्रिशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, उदयनिधी स्टॅलिन यांना अटक
यामुळे केली हत्या
हल्ल्यानंतर मुख्य आरोपी धर्मेंद्रसिंह वाघेला फरार झाला होता; तो आधी अहमदाबाद आणि नंतर लिंबडीच्या दिशेने पळून गेला. मात्र, भक्तिनगर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच त्याला लिंबडी महामार्गावरून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की, घनश्यामसिंह आपली हत्या करेल या भीतीनेच त्याने हा कट रचला होता. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. सध्या पोलीस कॉल डिटेल्स, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
