अभिनेत्री त्रिशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप, उदयनिधी स्टॅलिन यांना अटक
udhayanidhi stalin Arrested : कावेरी आंदोलनादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. या प्रकरणावरून तामिळनाडूतील राजकारण पुन्हा तापले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अभिनेत्री त्रिशासोबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप
उदयनिधी स्टॅलिन यांना अटक
udhayanidhi stalin Arrested : कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावर आयोजित आंदोलनादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात तामिळनाडू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आलीये. मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संबंध अभिनेत्री त्रिशाशी जोडला गेल्याचा आरोप करण्यात आला.
हेही वाचा : 'राजकीय करिअर तुझं...' मुंडेंवर घणाघात; जरांगेंनी आंदोलनाचा प्लॅनही सांगितला
स्टॅलिन यांच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून हा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावर दुपारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : शिक्षिकेला शाळेत घुसून संपवले, 21 वर्षीय तरुणानं केले 27 वार, नेमकं कारण काय?
