वाशीम : जवानाने गरोदर पत्नीला क्रूरपणे संपवलं, मेहुण्याकडून अनैतिक संबंध असल्याचे आरोप

मुंबई तक

washim crime news : वाशिमच्या कारंजा तालुक्यात सात महिन्यांची गर्भवती महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लष्करी जवानासह त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Washim Crime News
Washim Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वाशीम : जवानाने पत्नीला क्रूरपणे संपवलं

point

मेहुण्याकडून अनैतिक संबंध असल्याचे आरोप

Washim crime news, जका खान : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात एका लष्करी जवानाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कारंजा शहरातील शिवनगर परिसरात ही घटना घडली.  मराठा बटालियनमध्ये सेवा बजावणाऱ्या 28 वर्षीय ज्ञानेश्वर मदने याच्यावर पत्नी दीपालीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जवानासह त्याच्या आई-वडिलांविरोधात कारंजा शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत दीपाली ही सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती तिच्या भावाने दिली आहे.

हेही वाचा : नवरा ICU मध्ये, नवऱ्याचा मृत्यू...,स्मशानभूमीत पहारा; प्रेमविवाहाचा भयानक अंत

लष्करी जवानाचे अवैध संबंध असल्याचा आरोप

मृतका दीपालीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी सुमारे 3 वाजता लष्करी जवानाने त्याला फोन करून दीपाली घरात पडल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दीपालीचे कुटुंब मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात राहते. ही माहिती मिळाल्यानंतर तिचे कुटुंबीय काल सायंकाळी सुमारे 7 वाजता कारंजा येथे पोहोचले. दीपालीचा भाऊ राहुल माने याने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी जवानाचे अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. या कारणावरून तो दीपालीला त्रास देत होता. काही महिन्यांपूर्वी याच विषयावर दोन्ही कुटुंबांची बैठकही झाली होती. त्यावेळी समजूत घालून प्रकरण सोडवण्यात आले होते.

हेही वाचा : पुण्यात आल्यानंतर पहिल्या बॉयफ्रेंडला विसरली, एका प्रियकराने केला दुसऱ्याचा मर्डर