पुण्यात आल्यानंतर पहिल्या बॉयफ्रेंडला विसरली, एका प्रियकराने केला दुसऱ्याचा मर्डर
pune crime news : शाळेपासून प्रेमात असलेल्या तरुणीची पुण्यात आल्यानंतर सागरशी जवळीक वाढली. याच प्रेमसंबंधातून तिचा जुना प्रियकर दिनेश पीजीमध्ये पोहोचला आणि सागरची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात आल्यानंतर पहिल्या बॉयफ्रेंडला विसरली
एका प्रियकराने केला दुसऱ्याचा मर्डर
Pune Crime News : पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड या तरुणाची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एका तरुणीवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणात दिनेश महादेव झांबरे याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दिनेश आणि जखमी तरुणी यांचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. दोघेही बीसीएच्या शिक्षणासाठी पुण्यात आले होते. मात्र, पुण्यात आल्यानंतर या तरुणीची सागर गायकवाडसोबत जवळीक वाढली. तरुणी सागरसोबत पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. त्यामुळे दिनेश आणि सागर यांच्यातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हेही वाचा : 'तू त्याच्यासोबत का बोलतेस?' 17 वर्षीय मैत्रिणीचा घरात घुसून चिरला गळा अन्...
सागरला भेटायचंय म्हणून आला अन् थेट केला मर्डर
हिंजवडीतील या पीजीमध्ये सागर गायकवाड गेल्या चार दिवसांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री संबंधित तरुणी एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली. तिने पीजी संचालकाला सागर हा तिचा प्रियकर असल्याचे सांगितले. त्यानंतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील 310 क्रमांकाच्या खोलीत राहण्याची व्यवस्था करून दिली. दुसऱ्या दिवशी दुपारी दिनेश महादेव झांबरे हा पीजीमध्ये आला. त्याने कर्मचाऱ्यांना सागरला भेटायचे असल्याचे सांगितले. तसेच त्याची प्रेयसी याच पीजीमध्ये राहत असल्याचेही त्याने सांगितले. कर्मचाऱ्यांनी सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे सांगितल्यानंतर दिनेश थेट तिसऱ्या मजल्यावर गेला.
हेही वाचा : Personal Finance: महिन्याच्या पहिल्या 7 दिवसांत करा हे 7 आर्थिक निर्णय, तरच...
