नवरा ICU मध्ये, नवऱ्याचा मृत्यू...,स्मशानभूमीत पहारा; प्रेमविवाहाचा भयानक अंत

मुंबई तक

Crime News jhansi : झाशीजवळ राधा राठौरचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, पती सागर साहूने विष प्राशन केल्याने तो रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा ICU मध्ये, नवऱ्याचा मृत्यू...

point

स्मशानभूमीत पहारा; प्रेमविवाहाचा भयानक अंत

Crime News jhansi : झाशीजवळील बबीना कँट परिसरातील एका स्मशानभूमीत रात्री पोलिसांचा कडक पहारा पाहायला मिळाला. स्मशानभूमीत अर्धवट जळालेली चिता होती, तर त्याच्या जवळ लाल कपड्यात गुंडाळलेला मृतदेह ठेवण्यात आला होता. आजूबाजूला लाकडं विखुरलेली होती आणि पोलीस त्या मृतदेहाभोवती पहारा देत होते. या प्रकारामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांमध्येही कुतूहल निर्माण झालं होतं. हा मृतदेह राधा राठौर हिचा होता. विशेष म्हणजे, तिचा पती सागर साहू याचवेळी रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत होता. 32 वर्षीय सागर मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये एसी आणि फ्रिज दुरुस्तीचं काम करतो. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : शिंदेंवर नाही तसली टीका, प्रेसनंतर लगेच जरांगेंना फोन, जे जे बोलले ते सगळं ऐका!

सागरने विष प्राशन केलं अन् दुसरीकडे पत्नीचं टोकाचं पाऊल 

सागर आणि राधाचं लग्न होऊन अवघे नऊ महिने झाले होते. 2025 च्या सुरुवातीला सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली होती. लखनौची रहिवासी असलेली राधा सोशल मीडियावर रील्स बनवत असे आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. याच माध्यमातून तिची झाशीतील सागरशी ओळख झाली. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. मात्र दोघांच्या आग्रहामुळे कुटुंबीय तयार झाले आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघे मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये राहू लागले. मात्र सोमवार, 3 ऑगस्टच्या रात्री सागर पत्नी राधासोबत बबीना येथील घरी पोहोचला. त्यानंतर दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे स्पष्ट नसताना सागरने विष प्राशन केलं. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर झाशी मेडिकल कॉलेजमध्ये हलवलं.

हेही वाचा : पुण्यात आल्यानंतर पहिल्या बॉयफ्रेंडला विसरली, एका प्रियकराने केला दुसऱ्याचा मर्डर