शिंदेंवर नाही तसली टीका, प्रेसनंतर लगेच जरांगेंना फोन, जे जे बोलले ते सगळं ऐका!

मुंबई तक

Manoj Jarange Patil spoke to minister Uday Samant : मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेत मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांबाबत नाराजी व्यक्त केली. चार प्रमाणपत्रे वैध ठरवण्याची मागणी करत त्यांनी नोंदी रद्द होण्यावर सवाल उपस्थित केला.

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil spoke to minister Uday Samant
Manoj Jarange Patil spoke to minister Uday Samant
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिंदेंवर नाही तसली टीका

point

प्रेसनंतर लगेच जरांगेंना फोन, जे जे बोलले ते सगळं ऐका!

Manoj Jarange Patil spoke to minister Uday Samant : अंतरवाली सराटी येथून पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषद संपल्यानंतर लगेचच मंत्री उदय सामंत यांचा फोन आल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. या फोनवरील संभाषणात मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली. काही प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात झाल्याचा मुद्दा जरांगे पाटील यांनी सामंत यांच्यासमोर मांडला. संभाजीनगरमधील काही नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बीडमध्ये अमर अंबोरी यांच्या नोंदीचा उल्लेख करत, नोंद सापडल्यानंतर तिच्यावर एंडोर्समेंट करूनही ती रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात मराठ्यांच्या नोंदी बोगस असल्याचा गैरसमज पसरू शकतो, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 'तू त्याच्यासोबत का बोलतेस?' 17 वर्षीय मैत्रिणीचा घरात घुसून चिरला गळा अन्...

शिंदे यांच्या सांगण्याशिवाय अशा बैठका होऊ शकत नाहीत - जरांगे 

या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे यांच्यासाठी आपण अनेक खस्ता खाल्ल्या असून त्यांच्यावर आपला मोठा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शिंदे यांच्याशी संबंधित असलेल्या काही नेत्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. संभाजीनगरमध्ये एका नेत्याच्या कॉलेजवर आपल्या विरोधात अभ्यासक आणि समन्वयकांच्या बैठका झाल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी या बैठका झाल्याचेही त्यांनी संभाषणात म्हटले. शिंदे यांच्या सांगण्याशिवाय अशा बैठका होऊ शकत नाहीत, असा आपला विश्वास नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. शिंदे साहेब असे करण्यास सांगू शकत नाहीत, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.