मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत, राज ठाकरेंनी सगळंच काढलं
Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan : "पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सिनेमे बनवणारे आणि त्यांचं कौतुक करणारे कलाकार दुबईत राहातात. भारतात येऊन सरकारचे स्पॉन्सर्ड सिनेमे करतात", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत'
राज ठाकरेंनी सगळंच काढलं
Raj Thackeray on Vivek Oberoi and R. Madhavan, मुंबई : "नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात हजारो उद्योगपती परदेशात निघून गेले. ज्यांनी मोदींवर चित्रपट काढला होता, तो विवेक ओबेरॉय दुबईमध्ये राहायला गेला. तो भारतात राहात नाही. मोदींनी देशासाठी चांगलं काम केलंय म्हणातो तो आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. त्यांना जर देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे तर परदेशात का राहात आहेत? इथं येऊन सरकारने स्पॉन्सर्ड केलेले सिनेमे करतात आणि दुबईला राहातात", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मुंबईत मनसेने विद्यार्थी सेनेचा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.
हेही वाचा : "दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना...", राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर
जेन झी मुलांना काय हवंय हे समजून घेणं गरजेचं- राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आला. मी कामाला सुरुवात केली, तेव्हा काळ वेगळा होता. त्यावेळी तरुण वेगळा होता. आताचा वेगळा आहे. त्यावेळी विद्यार्थी वेगळे होते, आताचे वेगळे आहेत. आम्ही टेलिग्रामपासून इन्स्टाग्रामपर्यंतचा काळ पाहिला. आताचे जेन झी 1997 ते 2012 च्या दरम्यान जन्मलेले मुलं आहेत. या मुलांचं म्हणणं काय आहे. इंग्रजी बोलणारी मुलं फक्त जे झी नसतात. ग्रामीण भागात पण ही मुलं आहेत. मुंबई-पुण्याचे आणि दिल्लीचेच फक्त जेन झी नाहीत. त्यांना काय हवंय हे समजून घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा : 'सॉरी आई, मी निघून जातीये...' लग्नानंतर सातच महिन्यात शिक्षिकेने संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर
