"दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना...", राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर
Raj Thackeray on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं होतं. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी मला आणि घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्याचं सांगितलं. हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय, असं मोदी म्हणाले होते. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना..."
राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर
Raj Thackeray on Narendra Modi, मुंबई : "पीएम मोदी म्हणाले, मला विद्यार्थ्यांनी शिव्या दिल्या आणि माझ्या आईलाही शिव्या दिल्या.. हे चुकीचचं आहे. पण मला मोदींना सांगायचं आहे की, दुसऱ्यांनाही आई असते. हे तुम्ही तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुमच्या ट्रोल टीमकडून कोणत्या भाषेत ट्रोल केले जाते ते पाहा. मोदी सांगतात, मुलांना माफ केलं. जंतरमंतरवरच्या विद्यार्थ्यांची डोकं फोडली. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर फुटीमुळे आत्महत्या केली त्यांची माफी कोण मागणार आहे?" असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने केलेल्या भाषणात बोलत होते.
हेही वाचा : 'सॉरी आई, मी निघून जातीये...' लग्नानंतर सातच महिन्यात शिक्षिकेने संपवलं जीवन, धक्कादायक कारण समोर
भाजपने जे पेरलं तेचं उगवलं - राज ठाकरे
या वेळी राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांचा व्हिडीओ पाहिलाय. ते म्हणाले, ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती अयोग्य आहे. मला हे 100 टक्के मान्य आहे. पण मला पंतप्रधानांना सांगायचं आहे, हे तुमच्या पक्षातील लोकांना देखील सांगा.. तुमची ट्रोल करणारी टीम कोणत्या भाषेत बोलते..ते पाहा.. महाराष्ट्रातील अनेक कलाकार म्हणतात. बोलायला नको. काही करायलाच नको, कारण ट्रोल केलं जातं. त्याही लोकांना पंतप्रधांनी सांगावं हे बंद करावं. भाजपच्या ट्रोलच्या टीममुळेच हे सुरु झालं. जे पेरलं तेचं उगवलं आहे.
हेही वाचा : अभिजीत दिपकेंचा जेनझी बद्दलचा विचार काय? मुलाखतीत सगळे खळखळून हसले...
