अभिजीत दिपकेंचा जेनझी बद्दलचा विचार काय? मुलाखतीत सगळे खळखळून हसले...
abhijeet dipke on gen z thoughts : मुंबई Takला दिलेल्या विशेष मुलाखतीत अभिजीत दिपकेंनी 'जेनझी'बाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील तरुणांच्या बेरोजगारी, शिक्षण आणि लग्नासारख्या प्रश्नांवर त्यांनी स्वतःचे अनुभव सांगत भाष्य केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अभिजीत दिपकेंचा जेनझी बद्दलचा विचार काय?
मुलाखतीत सगळे खळखळून हसले...
abhijeet dipke on gen z thoughts : मुंबई Takने छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला. या विशेष मुलाखतीत जेनझी पिढीबद्दल समाजात तयार झालेली प्रतिमा, ग्रामीण भागातील तरुणांचे वास्तव आणि त्यांच्यासमोरील प्रश्न यावर चर्चा झाली. जेनझी म्हटले की सोशल मीडियावर रील्स बनवणारे, स्टाईल करणारे किंवा 'फोमो'सारखे शब्द वापरणारे तरुण एवढीच मर्यादित व्याख्या केली जाते. मात्र, ही व्याख्या अत्यंत संकुचित असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले. त्यांच्या मते, जेनझीची व्याप्ती केवळ शहरांतील सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांपुरती मर्यादित नसून ग्रामीण भारतातील लाखो तरुणही त्याच पिढीचा भाग आहेत.
1997 नंतर जन्मलेले तरुण म्हणजे जेनझी - अभिजीत दिपके
मुलाखतीदरम्यान जेनझीची व्याख्या आणि त्यांच्याविषयीचे गैरसमज यावर चर्चा करताना अभिजीत दिपके म्हणाले की, 1997 नंतर जन्मलेले तरुण म्हणजे जेनझी. त्यापैकी अनेकांनी शिक्षण पूर्ण केले असूनही त्यांना रोजगार मिळालेला नाही. पदवीधर असूनही मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार असल्याचे त्यांनी नमूद केले. संसदेत जेनझीची भाषा वापरणे किंवा त्यांच्या शब्दांचा वापर करणे म्हणजे त्या पिढीपर्यंत पोहोचणे नव्हे, तर त्यांच्या वास्तविक प्रश्नांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जेनझी ही केवळ शहरी किंवा डिजिटल जगात वावरणारी पिढी नसून ग्रामीण भागातील तरुणही तितकेच जागरूक असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: महिन्याला 2 हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांनी कोणती चूक टाळावी?
