BCA ची विद्यार्थीनी घरात एकटीच होती, क्लासमेट तिथे पोहोचला अन्.. काय घडलं?

मुंबई तक

lucknow bca student murder case : लखनौमध्ये 17 वर्षीय बीसीए विद्यार्थिनीची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. या प्रकरणात तिच्या क्लासमेटला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून प्रेमसंबंध आणि मोबाइल चॅटच्या आधारे तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

lucknow bca student murder case :
lucknow bca student murder case :
Google CTA

बातम्या हायलाइट

point

BCA ची विद्यार्थीनी घरात एकटीच होती

point

क्लासमेट तिथे पोहोचला अन्.. काय घडलं?

Lucknow bca student murder case : लखनौमध्ये बुधवारी एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले. बीसीएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीची तिच्याच घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. घटना घडली तेव्हा विद्यार्थिनी घरात एकटीच होती. तिचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत आढळून आला, तर तिचा क्लासमेट गंभीर जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी पडलेला होता. विद्यार्थिनीची मोठी बहीण कॉलेजमधून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा : शिवसेना नाव आणि चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात ठाकरेंची बाजू मांडताना सिब्बलांचा तुफान युक्तिवाद

दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याने वर्गमित्र भडकला 

ही घटना पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरपतखेडा परिसरात घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी तरुण चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या घरी आल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये अन्य एका तरुणाशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती तपासात पुढे आली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, दोघांमध्ये शाब्दिक वादानंतर झटापट झाली आणि रागाच्या भरात त्याने चाकूने विद्यार्थिनीचा गळा चिरला. पोलिसांनी या हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला असून त्याचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : मोलकरणीने निवृत्त कॅप्टनच्या पत्नीला संपवलं, नवरा अन् मुलाच्या मदतीने रचला कट