मोलकरणीने निवृत्त कॅप्टनच्या पत्नीला संपवलं, नवरा अन् मुलाच्या मदतीने रचला कट

मुंबई तक

Crime News : निवृत्त कॅप्टनच्या पत्नीच्या हत्येप्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमुळे धक्कादायक कट उघडकीस आला आहे. घरकाम करणारी महिला, तिचा पती आणि मुलाला पोलिसांनी अटक केली असून तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मोलकरणीने निवृत्त कॅप्टनच्या पत्नीला संपवलं

point

नवरा अन् मुलाच्या मदतीने रचला कट

Crime News : निवृत्त कॅप्टन मनमोहन लाल सिंह यांच्या पत्नी नीरा मेहता यांच्या हत्येप्रकरणी हरियाणातील पंचकुलामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंदीगडलगतच्या सेक्टर-21 परिसरात घडलेल्या या हत्याकांडातील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, त्यातून हत्येनंतरचा संपूर्ण घटनाक्रम उघड झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. या फुटेजमुळे प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी केलेल्या प्रयत्नांचे चित्र स्पष्ट झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीसीटीव्ही समोर आल्यानंतर या हत्येमागील कथित कट हळूहळू उघड होत असून, तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : खाकी वर्दीला काळिमा! पोलीस कॉन्स्टेबलकडून स्मशानभूमीत 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

मृतदेह शेजाऱ्याच्या घराच्या छतावर नेऊन चादरीने झाकला

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरात काम करणारी मोलकरीण सुनीता देवी आणि तिचा मुलगा नीरा मेहता यांचा मृतदेह घराबाहेर नेत असल्याचे दिसत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर दोघांनी मृतदेह शेजाऱ्याच्या घराच्या छतावर नेऊन चादरीने झाकून ठेवला, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्या झाल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा आणि संपूर्ण घटना लपवण्याचा प्रयत्न केला होता. मृतदेह शेजाऱ्याच्या छतावर लपवण्याची योजना ही देखील या कथित कटाचाच एक भाग होती, असे तपासात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : 'शिंदे, फडणवीसांचे आमदार पाडण्याची क्षमता...' जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?