'क्या बोलती पब्लिक', नावाने देशव्यापी अभियान, कॉकरोज जनता पार्टीची पुढची दिशा ठरली
Abhijeet Dipke and CJP Press Conference : 'क्या बोलती पब्लिक' या नावाने सप्टेंबरमध्ये देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीने केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'क्या बोलती पब्लिक', नावाने देशव्यापी अभियान
कॉकरोज जनता पार्टीची पुढची दिशा ठरली
Abhijeet Dipke and CJP Press Conference : छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीची दोन दिवसांची बैठक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला सौरव दास, आशुतोष रांका आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षाची पुढील वाटचालीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी पक्षाच्या आगामी भूमिका आणि कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सप्टेंबर महिन्यात 'क्या बोलती पब्लिक' या नावाने देशव्यापी अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
हेही वाचा : नागपूर: 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीकडून तुरूंगातून पिज्जा बर्गरची मागणी, म्हणाला..
गांधी, आंबेडकर अन् नेहरुंच्या विचारांवर काम करणार
पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दीपके यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत तो आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे म्हटले. मात्र, त्याहून मोठी उपलब्धी म्हणजे नागरिकांच्या मनातील भीती संपल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या काही वर्षांत सरकारने निर्माण केलेली भीती आता लोकांच्या मनातून दूर झाली असून नागरिक आता प्रश्न विचारण्यासाठी आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा ही भारतीय राज्यघटनेच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाहिलेल्या भारताच्या स्वप्नाला अनुसरून पक्ष काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर विश्वास ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : हिंगोलीत आयुष्य संपवलेल्या मुलाच्या आईची Abhijit Dipke यांच्याकडून काय अपेक्षा?
