नागपूर: 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीकडून तुरूंगातून पिज्जा बर्गरची मागणी, म्हणाला..

योगेश पांडे

Nagpur Crime News : नागपूरहून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने 16 वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी ही 12 वीत शिकत होती. याच आरोपीला स्थानिक पोलिसांना अटक केल्यानंतर कस्टडीत टाकण्यात आले. अशातच आरोपीने कस्टडीत राहून कस्टडीबाबत तक्रार केलीय.

ADVERTISEMENT

Nagpur Crime News
Nagpur Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

16 वर्षीय मुलीवर आत्याचार 

point

नशेचे पदार्थ अन् चॉकलेट देऊन पीडितेला.. 

Nagpur Crime News : नागपूरहून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने 16 वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी ही 12 वीत शिकत होती. याच आरोपीला स्थानिक पोलिसांना अटक केल्यानंतर कस्टडीत टाकण्यात आले. आता याच आरोपी तरुणाने पोलिसांकडे पिज्जा, बर्गर, प्रिमीयम जेवणाची मागणी केली. मच्छर पळवून लावण्यासाठीच्या ज्या साधन सामग्री असतात त्या वस्तूंची मागणी केली. त्याने तुरुंगातील अस्वच्छ शौचालय आणि भिंतीवरून तक्रार केली.  

हे ही वाचा : Astrology : सूर्य-शनी युती होणार, या राशींचे भाग्य उजळेल

या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे याला अटक केली. आरोपी 19 वर्षीय असून ठाणे शहर येथील रहिवासी आहे. निर्भय याच्यावरती हत्येचा प्रयत्न पोक्सो कायद्यान्वये विभिन्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

16 वर्षीय पीडितेवर आत्याचार 

पोलिसांच्या माहितीनुसार, वरिष्ठ सरकारी अधिकारी 16 वर्षीय मुलीला सोमवारी रात्री उशिरा नागूपर येथील दिघोरी परिसरात एका भाडेतत्त्वाच्या फ्लॅटवरून सोडवण्यात आले होते. तरुणीला 24 तासांपासून बंद दाराआड ठेवलं होतं. तिच्यासोबत सतत लैंगिक अत्याचार केला. त्याने पीडितेचे अश्लील व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले होते. नंतर चाकूने तिला जखमी केल्याची माहिती आहे. 

नशेचे पदार्थ अन् चॉकलेट देऊन पीडितेला.. 

माहितीच्या अधिकारानुसार, आरोपीने कथितरित्या पीडितेला नशेचे पदार्थ दिले आणि चॉकलेट खाऊ घातले. यानंतर अधिक काळ पीडितेवर अत्याचार करण्यात आला होता. पोलिसांनी आरोप केला की, आरोपीने कथितरित्या पीडितेच्या लैंगिक छळाचे व्हिडिओ बनवले. तिचे काही अश्लील फोटो देखील आरोपीने मिळवले होते.