हिंगोलीत आयुष्य संपवलेल्या मुलाच्या आईची Abhijit Dipke यांच्याकडून काय अपेक्षा?
neet paper leak : नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या धक्क्यानंतर आत्महत्या केल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थ्याच्या आईने अभिजीत दीपके यांची भेट घेत मदतीची मागणी केली. सरकार, आमदार आणि खासदारांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हिंगोलीत मुलानं आयुष्य संपवलं
आई दिपकेंच्या भेटीला, काय बोलणं झालं?
neet paper leak : हिंगोली येथील एका विद्यार्थ्याने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनेनंतर आत्महत्या केल्याचा आरोप करत त्याच्या आईने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत मदतीची मागणी केली. आपल्या मुलाने नीटची परीक्षा दिल्यानंतर पेपरफुटीची माहिती समजल्यापासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता, असा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, मुलगा दिवसाला 16 ते 17 तास अभ्यास करत होता आणि डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. पेपरफुटीची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपला इतका अभ्यास व्यर्थ गेल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावेळी आपण त्याला पुन्हा एक वर्ष अभ्यास करून परीक्षा देता येईल, असे समजावून सांगितले होते. मात्र त्यानंतर तो शांत राहू लागला, बोलणे कमी झाले आणि त्याने जेवणही सोडल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : सुनावणीत आरोप-प्रत्यारोप, राऊतांचा बाहेर येत इशारा, मागे सरोदे; काय झालं?
पतीचे सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, त्या हिंगोलीतील एका खासगी रुग्णालयात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांचे पती सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावले. मोठा मुलगा बीएमएसच्या शिक्षणाला लागला असून धाकटा मुलगा नीट परीक्षेची तयारी करत होता. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने मदतीच्या अपेक्षेने आपण अभिजीत दीपके यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडून तसेच संबंधित यंत्रणांकडून मदत मिळावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : नागपूर : 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून बलात्कार, 19 वर्षीय नराधमाला अटक; लॉकअपमध्ये पिझ्झाची मागणी
