खाकी वर्दीला काळिमा! पोलीस कॉन्स्टेबलकडून स्मशानभूमीत 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
Crime News : खाकी वर्दीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका हवालदाराने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तुरूंगात बंद असलेल्या आरोपीला पोलिसांनी रिमांडमध्ये घेत चौकशी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस कॉन्स्टेबलकडून 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर चाकूने वार
Crime News : खाकी वर्दीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका हवालदाराने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तुरूंगात बंद असलेल्या आरोपीला पोलिसांनी रिमांडमध्ये घेत चौकशी केली. तेव्हा आरोपीने आपल्या क्रूर कृत्याची माहिती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलीस देखील हादरून गेले होते. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील आहे.
हे ही वाचा : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे, परीक्षा केंद्रात घुसून विद्यार्थ्यांची झडती
पोलीस कॉन्स्टेबलकडून 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
आरोपीची ओळख अभिषेक यादव अशी समोर आली असून पोलिसांनी त्याची चौकशी केली. अभिषेकने पोलिसांना आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. पोलीस लाईनच्या सरकारी क्वार्टरमध्ये वापरण्यात येणारा चाकू सोबत घेऊन निघाला. 28 जुलै रोजी रात्री 10:00 वाजता त्याने गोरखपूर जिल्हा रुग्णालयातून 10 वर्षांच्या मुलीला फसवून तिचे अपहरण केले. नंतर पोलीस कॉन्स्टेबलने मुलीला थेट स्मशानभूमीत नेलं, जिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर चाकूने वार
कॉन्स्टेबलने पोलिसांनी कबूल केलं की, गेल्या वर्षभरापासून त्याची पत्नी आणि मुले वेगळे राहत असल्याने तो पोलीस क्वार्टर्समध्ये एकटाच राहतो. त्याला मुलींना त्रास दिल्यानंतर आनंद मिळतो. जेव्हा मुलगी ओरडली आणि कोणीतरी येईल या भीतीने त्याने त्या निष्पाप मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. पीडितेची ओळख पुसून टाकण्यासाठी, कॉन्स्टेबललने मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर चाकूने वार करून विद्रूपीकरण केले. त्याने मुलीच्या कमरेखाली एक दोरी घेऊन तिचे हात पाठीमागे बांधले आणि तिचा मृतदेह चिउताहा पुलावरून खाली फेकून दिला होता.
हे ही वाचा : नागपूर: 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीकडून तुरूंगातून पिज्जा बर्गरची मागणी, म्हणाला..
दरम्यान, 4 ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल अभिषेक यादवला पोलिसांनी तुरूंगातून ताब्यात घेतलं. पोलीस पथकाने आरोपीला जिल्हा रुग्णालय. स्मशानभूमि आणि चियुताहा ब्रिज येथे नेले, जिथे घटनेची पुनर्रचना करण्यात आली होती. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांमध्ये हत्येत वापरण्यात आलेला चाकू जप्त करून तो न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणं असंय की, मोबाईल लोकेशन, न्यायवैद्यक अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबाची पाहणी केली. या प्रकरणात न्यायालयीन संघर्ष सुरू आहे.
