शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून रोहित पवार आणि जयकुमार गोरे यांच्यात जुंपली

मुंबई तक

Rohit pawar farmer protest : पंढरपुरात सुरू असलेल्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनात रोहित पवार हे राज्य सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात यावी. तसेच 2 लाखांहून अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या अटींसह कर्जमाफी लागू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याच प्रकरणी रोहित पवार आणि जयकुमार गोरे यांच्याच चांगलीच जुंपली आहे.

ADVERTISEMENT

google news

Rohit pawar farmer protest : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत. सध्या पंढरपुरात सुरू असलेल्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनात रोहित पवार हे राज्य सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात यावी. तसेच 2 लाखांहून अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या अटींसह कर्जमाफी लागू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच शेतकऱ्यांविरोधीतील अटी रद्द करून 1 रुपयात पीकविमा ही योदना पुन्हा एकदा लागू करावी अशी मागणी या आंदोलनातून होते. मात्र, आता याच आंदोलनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नौटंकी स्टंटबाजी म्हणून हल्लाबोल केला. नंतर त्यांनी कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचं कौतुक केलं. तसेच याचवर रोहित पवार यांनी जयकुमार यांच्यावर चांगलाच पलटवार केला.  

रोहित पवार यांनी भाषणातून कर्जमाफीच्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच याचवर शेतकऱ्यांनी योग्य तो मार्ग शोधावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याच संदर्भात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे हे अगदी महत्त्वपूर्ण आहे. 

 

हे वाचलं का?