बीड : 'अहो, चिकन राईस आणा..' नवरा गेला अन् आला प्रियकराचा निरोप 'कार्यक्रम ओके'

मुंबई तक

बीडमधील लिंबागणेश परिसरात झालेल्या किरण सोनवणे हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. प्रियकराच्या मदतीने किरणच्या बायकोनेच त्याची हत्या घडवून आणली.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : 'अहो, चिकन राईस आणा..' नवरा गेला

point

अन् आला प्रियकराचा निरोप 'कार्यक्रम ओके'

Beed Crime, योगेश काशीद : बीडमधील लिंबागणेश परिसरात झालेल्या किरण सोनवणे हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. पत्नी प्रियंका सोनवणे हिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. किरणाला चिकन राईस आणण्यासाठी घराबाहेर पाठवून प्रियंकाने त्याच्या हालचालीची माहिती प्रियकर दशरथ परदेशीला दिली. या सापळ्यात अडकवून दशरथने आपल्या एका साथीदारासह किरणची निर्घृण हत्या केली.

'कार्यक्रम ओके' आणि इन्स्टाग्रामवर संवाद

हत्या केल्यानंतर प्रियकर दशरथ परदेशी याने प्रियंकाला फोन करून 'कार्यक्रम ओके' असा निरोप दिला. विशेष म्हणजे, पतीचा मृत्यू झाल्याचे माहीत असूनही प्रियंकाने त्या रात्री तब्बल चार ते पाच तास इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दशरथशी संवाद साधला. नेकनूर पोलिसांनी तांत्रिक तपास करत इन्स्टाग्रामवरील संवादाचे आणि कॉल रेकॉर्डचे महत्त्वाचे डिजिटल पुरावे हस्तगत केले आहेत. या पुराव्यांनीच या हत्येचा बनाव उघड करण्यास मोठी मदत केली आहे.

हे ही वाचा : NEET ची तयारी करणाऱ्या गर्लफ्रेंडला पुलावर घेऊन गेला अन्..., बॉयफ्रेंडने काय केलं?

अपघाताचा बनाव फसला

31 मे रोजी लिंबागणेश परिसरात किरण सोनवणेचा मृतदेह त्याच्या दुचाकीसह रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. सुरुवातीला हा एक अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दशरथ आणि त्याचा मित्र धीरज येडे यांनी किरणचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर ही घटना अपघाती वाटावी यासाठी दुचाकी त्याच्या अंगावर टाकून दिली होती. मात्र, पोलिसांच्या सूक्ष्म तपासात हा अपघाताचा बनाव फसला आणि ही सुनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा : 'नवरा कामावर गेल्यावर सासरा माझ्यासोबत...' सुनेनं गाठलं पोलीस स्टेशन; काय घडलं?

पोलीस कोठडी आणि हत्येचे कारण

याप्रकरणी नेकनूर पोलिसांनी पत्नी प्रियंका सोनवणे, प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रियंकाचा पती दारू पिऊन तिला वारंवार त्रास देत होता, याच जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. पोलीस आता या प्रकरणातील अधिक धागेदोरे शोधत आहेत.
 

हे वाचलं का?