धक्कादायक... आमदार निवासाच्या इमारतीवरून पडून भाजपच्या माजी मंत्र्याचा मृत्यू

मुंबई तक

उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते नानक राम भुरजी यांचा लखनौमधील आमदार निवासस्थान संकुलातील इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

bjp leader and former minister nanak ram bhurji  dies after falling from mla residence building in lucknow
भाजपच्या माजी मंत्र्याचा मृत्यू (प्रातिनिधिक फोटो)
Google CTA

लखनौ: उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नानक राम भुरजी यांचा मंगळवारी (28 जुलै) अत्यंत विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या हजरतगंजमधील आमदार निवास संकुलातील एका उंच इमारतीवरून पडून नानक राम भुरजी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

68 वर्षीय भाजप नेते नानक राम भुरजी हे दारुलशफा येथील नवीन आमदार वसतिगृहाच्या उंच इमारतीवरून पडले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मानसिक ताण आणि दीर्घकालीन आजार

पोलिसांच्या तपासातील प्राथमिक निष्कर्ष खूपच चिंताजनक आहेत. असे वृत्त आहे की, माजी मंत्री नानक राम भुरजी हे मागील काही काळापासून तीव्र नैराश्याने ग्रस्त होते. दारुलशफा कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते गेल्या काही दिवसांपासून आमदार निवासाजवळ एकटेच फिरताना दिसायचे.

हे ही वाचा>> बायकोचे अफेयर असल्याचा पतीला संशय, पंख्याला लटकवून मारलं

जेव्हा आमदार निवासाच्या प्रभारींनी स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली, तेव्हा एकच गोंधळ उडाला. पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि रक्ताने माखलेल्या नानक राम भुरजी यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचे प्राण वाचवता आले नाही.