बायकोचे अफेयर असल्याचा पतीला संशय, पंख्याला लटकवून मारलं

मुंबई तक

Crime News : नवऱ्यानेच आपल्या पत्नीचा इतर कोणासोबत तरी अफेयर असल्याचा संशय व्यक्त केला होता. याच संशयातून त्याने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. तिला पंख्याला टकवून तिचा व्हिडिओ शेअर केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा-बायकोचा सतत वाद

point

बायकोला पंख्याला लटकवून व्हिडिओ शेअर केला 

Crime News : कर्नाटकच्या बागलकोट येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवऱ्यानेच आपल्या पत्नीचा इतर कोणासोबत तरी अफेयर असल्याचा संशय व्यक्त केला होता. याच संशयातून त्याने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. पतीची प्रवीण जिगलूर अशी ओळख समोर आली होती. तर 23 वर्षीय पत्नीची भाग्यश्री अशी ओळख समोर आली. प्रवीणने भाग्यश्रीला मारहाण केली, नंतर पंख्याला लटकवले. 

हे ही वाचा : लेकीचं मुलावर प्रेम, ओढणीनं गळा आवळून आईनं मुलीला संपवलं

बायकोला पंख्याला लटकवून व्हिडिओ शेअर केला 

पत्नीला पंख्याला लटकवल्यानंतर आरोपी शांत बसला नाही, त्याने पत्नीला तडफडत ठेवले, व्हिडिओ बनवला नंतर तोच फोटो अनेक लोकांसोबत शेअर करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण आणि भाग्यश्री यांच्यात सतत भांडण होतात. याच त्रासाला कंटाळून भाग्यश्री दोन महिन्यांपूर्वी आपले सासर सोडून महालिंगपूर येथे आई वडिलांसोबत राहायला गेली होती. 

नंतर प्रवीण तिच्या माहेरी देखील पोहोचला होता. तो पत्नीसोबत सुखाने राहील असं सांगून तिची आणि तिच्या आई वडिलांची समजूत काढू लागला होता. घरी परतताच त्याच सायंकाळी त्याने पत्नीची हत्या केली. पत्नी एक-एक श्वासासाठी तडफडत होती, मात्र पतीच्या मनाला पाझर फुटला नाही. 

हे ही वाचा : Astrology : मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे भाग्य उजळणार

आरोपी नवरा अटकेत 

ज्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायचं होतं, त्याच व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. ज्या ठिकाणी प्रवीणने भाग्यश्रीला मारहाण केली, त्यामागे एक भिंतीवर दोघांचेही नाव लिहिलेलं आढळलं होतं. संबंधित प्रकरणात पोलिसांना हत्येची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला.