'Gen Z ला काय बोलायचं? आता बोलणंही अवघड झालंय.. केमिकल लोचा', IPS नांगरे-पाटील असं का म्हणाले?
Vishwas Nangare-Patil: नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणाने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी जो Gen Z चा उल्लेख केला त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ADVERTISEMENT

नागपूर: महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी केलेले भाषण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे कमी होत चाललेली एकाग्रता, तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व, संकटांना सामोरे जाण्याची क्षमता आणि देशसेवेची प्रेरणा अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना थेट आणि प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले. पण यावेळी त्यांनी एक जे विधान केलं त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
'आजच्या Gen Z ला काही बोलणंही कठीण झालं आहे'
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आजच्या तरुणांच्या मोबाईल व्यसनावर भाष्य केले.
"आता आपण मोबाईलवर बिझी होतो.. Gen Z ला काय बोलू शकतो आता आपण? त्यांना बोलणंही अवघड झालंय. स्क्रीन टाइम 6 तास, 7 तास.. स्क्रोलिंग.. पण 5 सेकंदात इथून तिथे, तिथून दुसरीकडे.. आपला मेंदू सारखा उड्या मारतोय. त्यामुळे मेंदूमध्ये काय केमिकल लोचा होतो ते कोणीही समजू शकत नाही."
"Focus करा, म्हणजे शिकाल. शिकाल तर प्रगती कराल. आणि प्रगती केली तरच आयुष्याचा आनंद खऱ्या अर्थाने घेता येईल. त्यामुळे आधी विकास, मग मनोरंजन."
16 ते 18 वर्षे आयुष्य घडवणारी
विश्वास नांगरे-पाटील यांनी संस्कृतमधील एका श्लोकाचा संदर्भ देत सांगितले की तरुणपण, संपत्ती, सत्ता आणि विवेकाचा अभाव यांपैकी एक गोष्टही आयुष्य बिघडवण्यासाठी पुरेशी असते. त्यांनी सांगितले की 16 ते 18 वर्षे हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. याच वयात मेंदूतील प्री-फ्रंटल कॉर्टेक्स विकसित होत असतो, जो निर्णयक्षमता आणि विवेकाशी संबंधित आहे.
