Maharashtra Monsoon Update: धो-धो कोसळणार पाऊस, वादळी वाऱ्यांचाही जोर.. तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

मुंबई तक

Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

maharashtra monsoon update heavy rainfall and strong gusty winds alert issued for next few days
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असला तरी आता येणारे काही दिवस राज्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

सध्या बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण तयार झाले असून तेथे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. ही प्रणाली ओडिशा किनारपट्टीजवळ अधिक सक्रिय होत असून तिची वाटचाल पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशेकडे होण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा>> Govt Jobs : सरकारी बँकेत पदवीधरांसाठी मोठी भरती, लगेच करा अर्ज

हवामान तज्ज्ञांच्या मते, ही प्रणाली मध्य भारताच्या दिशेने सरकत असताना अरबी समुद्रातील दमट वाऱ्यांशी तिचा संबंध येईल. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगल्या पावसाची शक्यता

हवामानाशी संबंधित संस्थांनीही पुढील काही दिवस मॉन्सून अधिक सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, बंगालच्या उपसागरात आणखी कमी दाबाची क्षेत्रे तयार होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम मध्य भारत आणि महाराष्ट्रातील पावसावर होऊ शकतो.