Govt Jobs : सरकारी बँकेत पदवीधरांसाठी मोठी भरती, लगेच करा अर्ज

मुंबई तक

इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी आकर्षक मानधन दिले जाणार आहे. अर्जाची अंतिम तारीख 27 जुलै आहे.

ADVERTISEMENT

Banking Recruitment
Banking Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सरकारी बँकेत पदवीधरांसाठी मोठी भरती

point

लगेच करा अर्ज

Banking Recruitment : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) द्वारे पदवीधर उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदांच्या तब्बल 750 जागांसाठी भव्य भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतातील बँकेच्या विविध शाखांमध्ये एका वर्षाच्या करारावर अप्रेंटिस म्हणून काम करण्याची आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

पात्रतेचे निकष काय?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्याधेत सूट देण्यात आली असून, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट लागू राहील. या पदासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.

हे ही वाचा : पीएम मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचा ठिय्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी

अर्जाची अंतिम तारीख

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित अंतिम तारीख 27 जुलै ही आहे. अर्जासाठी सर्वसाधारण (General) आणि ओबीसी उमेदवारांना 944 रुपये शुल्क आकारले जाईल, तर एससी/एसटी उमेदवारांसाठी 708 रुपये आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी 472 रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

हे ही वाचा : मोदींना 'लेम डक' प्रेसिडेंटची उपमा, सरकारला म्हणाले मानसिक रुग्ण.. राज ठाकरेंची नवी फेसबुक पोस्ट पाहिली का?

मानधन किती?

निवड झालेल्या अप्रेंटिस उमेदवारांना त्यांच्या शाखेच्या विभागानुसार दरमहा विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. यामध्ये मेट्रो शहरांतील शाखांसाठी 15,500 रुपये, शहरी (Urban) शाखांसाठी 14,500 रुपये आणि निम-शहरी/ग्रामीण शाखांसाठी 14,000 रुपये विद्यावेतन निश्चित करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेनुसार (NATS) भारत सरकारचा 6,150 रुपयांचा वाटा थेट उमेदवारांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केला जाईल, तर उरलेली रक्कम बँकेकडून अदा केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बँकेच्या www.iob.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

हे वाचलं का?