मोदींना 'लेम डक' प्रेसिडेंटची उपमा, सरकारला म्हणाले मानसिक रुग्ण.. राज ठाकरेंची नवी फेसबुक पोस्ट पाहिली का?
Raj Thackeray on CJP Protest : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरुन संताप व्यक्त केलाय. शिवाय, त्यांनी मोदींना 'लेम डक' प्रेसिडेंटची उपमा दिलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोदींना 'लेम डक' प्रेसिडेंटची उपमा, सरकारला म्हणाले मानसिक रुग्ण..
राज ठाकरेंची नवी फेसबुक पोस्ट पाहिली का?
Raj Thackeray on CJP Protest : नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारुन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दरम्यान, 18 जुलै रोजी पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरपासून मोर्चाला सुरुवात केली. 20 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या आंदोलनात उतरले. मात्र, पोलिसांनी या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. शिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलन अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीचार्जबाबत देशभरातून संताप व्यक्त करण्यात आलाय. याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे सविस्तर भूमिका मांडलीये. ते काय म्हणाले? जाणून घेऊयात..
हेही वाचा : 'आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव, उद्या वेळ पडली तर...' संजय राऊतांचा निर्वाणीचा इशारा
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
केंद्र सरकारने शनिवार 18 जुलै 2026 ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे.
हेही वाचा : 'आमच्या शिष्टमंडळाला नजरकैद करण्यात आलं...' दिपकेंनी काय सांगितलं? आंदोलनाची पुढील दिशा काय?










