श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक 6 तास 30 मिनिटे…
पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक रात्री ९.३० वाजता बेलबाग चौकातून सुरू होऊन पहाटे ४ वाजता पातळेश्वर विसर्जन घाटावर संपन्न झाली. लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मार्गावर काही गणेश मंडळांना मध्येच प्रवेश दिल्याने विलंब झाला, तरीही बाप्पाची मिरवणूक ६ तास ३० मिनिटांत पूर्ण झाली.
ADVERTISEMENT

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक
पुणेः हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकातून रात्री ९.३० वाजता सुरू झाली. पहाटे ३.१५ वाजता टिळक चौकातून ही मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. बरोबर पहाटे ४ वाजता पातळेश्वर विसर्जन घाटावर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मार्गावर अनेक गणेश मंडळांना मध्येच प्रवेश दिल्याने परिणामी विसर्जन मिरवणुकीला काहीसा विलंब झाला.

तरीही ६ तास ३० मिनिटांत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली.
परंपरेचा मान, भक्तीचा उत्साह आणि बाप्पाच्या मार्गातील अडथळ्यांवर मात करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विसर्जनस्थळी मार्गस्थ झाला!
गणपती बाप्पा मोरया!
