महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन, फिटनेस क्लबच्या मालकावर गुन्हा दाखल
hyderabad crime news : हैदराबादमध्ये गणेश विसर्जन बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप फिटनेस क्लबच्या मालकावर करण्यात आला आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर मेरपेट पोलिसांनी BNSच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन
फिटनेस क्लबच्या मालकावर गुन्हा दाखल
हैद्राबादमध्ये गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका फिटनेस क्लबच्या मालकावर करण्यात आला आहे. अल्मासगुडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मेरपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित व्यक्तीने महिला अधिकाऱ्याला तिचे शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हेही वाचा : पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण; दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
घटनास्थळी गोंधळ होत असल्याची माहिती, महिला अधिकारी पोहोचल्या अन्..
महिला पोलीस उपनिरीक्षक देवुलापल्ली उमा महेश्वरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 23 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अल्मासगुडा कमान आणि श्लोका स्कूलजवळ ही घटना घडली. हा परिसर मेरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी त्या परिसरात तैनात होत्या. यावेळी ऑक्सिजन फिटनेस क्लबजवळ काही जण गोंधळ घालत असल्याचे आणि त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हेही वाचा : अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंच्या वाढदिवशी फडणवीसांची पोस्ट; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण
