पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण; दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
Bigg Boss Marathi fame and social media influencer Divya Shinde has been arrested : बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला पुण्यात एका 65 वर्षीय निवृत्त सरकारी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तिने आपल्या साथीदारांसह डॉक्टरच्या घरात घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण
दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
Bigg Boss Marathi fame and social media influencer Divya Shinde has been arrested : पुणे पोलिसांनी 'बिग बॉस मराठी'ची माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिला एका निवृत्त सरकारी डॉक्टरांना त्यांच्याच घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. ही अत्यंत धक्कादायक घटना 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुण्याच्या महंमदवाडी परिसरातील न्याती हाईलँड्स येथे घडली. या हल्ल्यामध्ये 65 वर्षीय डॉ. विद्याधर गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदे आणि तिच्या इतर साथीदारांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली.
हेही वाचा : जालना : छकुलीचे गावातल्या परपुरुषाशी प्रेमसंबंध, प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या; अपघाताचा बनाव
दिव्या शिंदेला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक
सोशल मीडियावर 'सरकार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या दिव्याला यावर्षी फेब्रुवारीमध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधून इतर स्पर्धकांना धमकावल्याच्या आरोपावरून बाहेर काढण्यात आले होते. या ताज्या प्रकरणाची माहिती देताना काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, दिव्या शिंदेला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून तिला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : लाईट लावण्यावरून सावत्र आईची मुलाकडून हत्या, मांडी, कंबर, छाती आणि मानेवर गंभीर जखमा
