जालना : छकुलीचे गावातल्या परपुरुषाशी प्रेमसंबंध, प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या; अपघाताचा बनाव

मुंबई तक

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील वाकडी येथे 26 वर्षीय शुभम वाघ यांच्या मृत्यूचे प्रकरण सुरुवातीला रस्ते अपघात म्हणून समोर आले. मात्र, वडिलांच्या तक्रारीनंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पत्नीसमेत तिघांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Jalna Crime News
Jalna Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जालना : छकुलीचे गावातल्या परपुरुषाशी प्रेमसंबंध

point

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या; अपघाताचा बनाव

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाकडी शिवारात 26 वर्षीय शुभम वाघ यांच्या मृत्यूचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सुरुवातीला शुभम यांचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचे मानले जात होते. मात्र, मृतकाचे वडील येडुबा राजाराम वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. त्यांच्या तक्रारीनुसार, शुभम यांच्या पत्नीचे गावातील रवी चिंचपुरे याच्यासोबत कथित प्रेमसंबंध होते आणि या संबंधात शुभम अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. या आरोपांच्या आधारे भोकरदन पोलीस ठाण्यात पत्नी पूनम उर्फ छकुली वाघ, सोपान  जाधव आणि रवी  चिंचपुरे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, सध्या त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : लाईट लावण्यावरून सावत्र आईची मुलाकडून हत्या, मांडी, कंबर, छाती आणि मानेवर गंभीर जखमा

मोटारसायकलने जोरदार धडक देऊन संपवल्याचा आरोप 

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, शुभम वाघ यांचा विवाह नोव्हेंबर 2024 मध्ये पुनम उर्फ छकुली हिच्यासोबत झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्याच काळात शुभम यांच्या कुटुंबीयांना पुनमचे गावातील रवी चिंचपुरे याच्यासोबत कथित प्रेमसंबंध असल्याची आणि दोघांमध्ये फोनवरून संपर्क असल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शुभम यांनी यासंदर्भात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. तक्रारीनुसार, हा दावा मागे घ्यावा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी कथित धमकी रवी चिंचपुरे याने 4 जुलै 2026 रोजी शुभम यांना दिली होती. त्यानंतर 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजून 55 मिनिटांनी शुभम नेहमीप्रमाणे भोकरदन रोडवरील आपल्या शेतात झोपण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी वाकडी-भोकरदन रोडवर कैलास चिंचपुरे यांच्या शेताजवळ सोपान जाधव याने मोटारसायकलने शुभम यांना जोरदार धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पाऊस गायब? तर काही ठिकाणी हलका ते मध्यम..