'आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव, उद्या वेळ पडली तर...' संजय राऊतांचा निर्वाणीचा इशारा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जंतर-मंतरवर सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जर सरकारने जास्त तेल टाकायचा प्रयत्न केला तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात राऊत यांनी केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव, उद्या वेळ पडली तर...'
संजय राऊतांचा निर्वाणीचा इशारा
Sanjay Raut On Delhi Protest : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जंतर-मंतरवर सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे आंदोलन चिरडता येणार नाही असं राऊत म्हणाले. तसेच जर सरकारने जास्त तेल टाकायचा प्रयत्न केला तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच उद्या वेळ पडली तर आम्ही सगळे इथे येऊन बसू असंही राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचीही भेट घेतली.
'हुकूमशाहीला लाजवणारा प्रकार'
संजय राऊत म्हणाले की, 'पहिल्या दिवसापासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवाजी पार्कला जी तरुणांची रॅली झाली ती डोळे दिपवणारी होती. कालसुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणात तरुण जमले. पुणे, नागपूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यात या ठिणग्या पडताना दिसताहेत. काल जो प्रकार दिल्लीच्या रस्त्यावर झाला, तो हुकूमशाहीलाही लाजवणारा होता.'
हे ही वाचा : नीट पेपर फुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?
'उद्या वेळ पडली तर...'
पुढं राऊत म्हणाले की, 'काल संध्याकाळी मी इथे येऊन गेलो. सामसूम होती. मंडपसुद्धा काढला होता. माईक तोडला होता. आज परत या मुलांनी सगळ्यांनी हे उभं केलंय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तरुणांचे हे आंदोलन चिरडता येणार नाही. ते पेटलेलं आहे आणि तुम्ही त्यात जास्त तेल टाकायचा प्रयत्न कराल तर हे सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या वेळ पडली तर आम्ही सगळे इथे येऊन बसू. आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव आहे. आम्ही तुरुंगाला घाबरत नाही. आम्ही तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही. आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्यात आम्ही आहोत.'
हे ही वाचा : जब संसद मौन हो जाती है, तो सड़के बोलने लगती है...
'अमानुष पद्धतीचं राज्य'
केंद्र सरकारवर घणाघात करताना राऊत म्हणाले की, 'या देशात आपण राहतोय आणि देशावर अशा प्रकारचे राज्यकर्ते आहेत याची प्रथम आम्हाला घृणा वाटली. या देशात अनेकांनी राज्य केलं. विरोधी पक्षांनी केलं, काँग्रेस पक्षाने केलं. पण एवढं घृणास्पद आणि अमानुष पद्धतीचं राज्य यापूर्वी कुणी केलं नाही मला इदी अमीनची आठवण झाली.'










