जब संसद मौन हो जाती है, तो सड़के बोलने लगती है...
centre point : पंतप्रधानांच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच्या भाषणात विरोधाभास दिसून आला. एकीकडे नरेंद्र मोदी प्रत्येक आवाजाला संधी मिळावी आणि प्रत्येक विचाराचा सन्मान व्हावा असं म्हणत होते. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात येत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जब संसद मौन हो जाती है
तो सड़के बोलने लगती है...
centre point : संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तथ्य, तर्क आणि संसदेतील सन्मानपूर्वक चर्चेवर भर दिला. "प्रत्येक आवाजाला संधी मिळावी आणि प्रत्येक विचाराचा सन्मान व्हावा," असे आवाहन त्यांनी केले. मात्र, त्याचवेळी जंतर-मंतर परिसरात आंदोलनासाठी एकत्र येणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर सेंटर पॉईंटमध्ये सरकारच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला. संवादाची भाषा बोलणारे सरकार प्रत्यक्षात आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी पोलिसी कारवाईचा मार्ग का स्वीकारत आहे, हा सवाल आहे.
हेही वाचा : महिलेचा लोकलच्या दारात लटकून प्रवास, पण वाटेत रेल्वेच्या पुलाचा खांब आला, थरारक VIDEO
सरकारने संवादाऐवजी स्वीकारला दडपशाहीचा मार्ग
पंतप्रधानांनी तरुणांच्या असीम क्षमता आणि आकांक्षांचा उल्लेख केला. त्याच दिवशी सोनम वांगचूक यांच्या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि विविध कार्यकर्ते जंतर-मंतरवरून संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी जमत होते. नीट, सीईटी आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित घोळाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. मात्र, आंदोलन रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आले. विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले. सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. याचवेळी संसदेत नीट प्रकरणावर चर्चा करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरून गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार स्थगित करण्यात आले.
हेही वाचा : जंतर-मंतरवर आंदोलक पुन्हा जमायला सुरुवात, जोरदार घोषणाबाजी सुरु










