महिलेचा लोकलच्या दारात लटकून प्रवास, पण वाटेत रेल्वेच्या पुलाचा खांब आला, थरारक VIDEO
diva csmt local shocking viral video : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! धावत्या लोकलच्या दारात लटकलेल्या महिलेचा थरारक बचाव; व्हायरल व्हिडिओने रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!
काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
diva csmt local shocking viral video :मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील जीवघेण्या प्रवासाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. दिवा–सीएसएमटी लोकलमध्ये धावत्या गाडीच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जीव थोडक्यात वाचावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, काही क्षणांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. या व्हिडिओमुळे मुंबईच्या लोकलमधील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : Jantar Mantar Protest: अभिनेते प्रकाश राज ज्या ट्रकवर चढले त्याच्या टायरची हवाच पोलिसाने काढली, प्रचंड गोंधळ
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, महिलेचा वाचला जीव
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला लोकलच्या दारात लटकून प्रवास करताना दिसत आहे. धावत्या गाडीदरम्यान तिची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला घासल्याने काही क्षणांसाठी अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रसंग इतका थरारक होता की, क्षणभर महिलेचा तोल जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि महिलेचा जीव वाचला. या घटनेनंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Jantar Mantar Protest: अभिनेते प्रकाश राज ज्या ट्रकवर चढले त्याच्या टायरची हवाच पोलिसाने काढली, प्रचंड गोंधळ










