Jantar Mantar Protest: अभिनेते प्रकाश राज ज्या ट्रकवर चढले त्याच्या टायरची हवाच पोलिसाने काढली, प्रचंड गोंधळ
जंतरमंतर ते संसद भवन मोर्चादरम्यान दिल्लीत मोठा तणाव निर्माण झाला. आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रकाश राज यांच्या ट्रकची हवा पोलिसांनी काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता नाट्यमय वळण मिळालं आहे. जंतरमंतर मैदानापासून संसद भवनापर्यंत आज मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.
आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर
आंदोलक पुढे सरकू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला तसेच अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर करण्यात आला आहे. यानंतर आंदोलनस्थळी बराच काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा>> CJP आंदोलकांवर निर्घृणपणे लाठीचार्ज, जंतर-मंतरवर नेमका राडा झाला तरी कसा? पाहा VIDEO
सोनम वांगचूक रुग्णालयात; नेतृत्वाची धुरा प्रकाश राज यांच्या हाती
या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे आंदोलनाचं नेतृत्व अभिनेते प्रकाश राज यांनी स्वीकारलं. त्यांच्यासोबत अभिजीत दिपके यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन करत आंदोलनाची धुरा सांभाळली.
ट्रकवरून आंदोलनाची सुरुवात; पोलिसांनी रस्त्यातच रोखला ताफा
प्रकाश राज यांनी आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आणि मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी एका ट्रकवर चढून मोर्चाची सुरुवात केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा ट्रक रस्त्यातच अडवला. एवढंच नव्हे तर, ज्या ट्रकवर प्रकाश राज बसले होते त्या ट्रकच्या टायरमधील हवा एका पोलिसाने काढण्यात आली.










