’म्हशीने लवकर दूध द्यावे म्हणून ते इंजेक्शन..’, मुंढेंच्या नेतृत्वात FDA ची तगडी कारवाई, काय घडलं?
ulhasnagar fda police raid : उल्हासनगरातील एका गोठ्यावर एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या 612 बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी गोठा चालकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
’म्हशीने लवकर दूध द्यावे म्हणून ते इंजेक्शन..’,
मुंढेंच्या नेतृत्वात FDA ची तगडी कारवाई, काय घडलं?
ulhasnagar fda police raid : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर प्रतिबंधित औषधांविरोधातील कारवाईला वेग आला असून, त्याचाच भाग म्हणून उल्हासनगरमध्ये एफडीए आणि मध्यवर्ती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या तब्बल 612 प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. दूध देणाऱ्या म्हशींकडून लवकर दूध उतरवण्यासाठी या इंजेक्शनचा बेकायदेशीर वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : 'जिथे तर्क आणि तथ्य असतात..', पीएम मोदींचा युवकांना संदेश; '56 वर्षीय तरुणाला' टोला
म्हशींना लवकर पान्हा फुटण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर
मिळालेल्या तक्रारीनुसार, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोठ्यात दूध देणाऱ्या म्हशींना कृत्रिमरीत्या लवकर पान्हा फुटावा यासाठी प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जात होता. त्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने आणि एफडीएच्या पथकाने उल्हासनगर कॅम्प-3 येथील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूलजवळ असलेल्या गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत गोठा चालक प्रकाश अमरलाल वाधवानी (वय 64) यांच्या ताब्यातून प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या 612 प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या या इंजेक्शनची अंदाजे किंमत सुमारे 11 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तोबा गर्दी, ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडीओ पाहाच VIDEO










