नवऱ्याचा खून, रक्ताच्या थारोळ्यात मुलगा; मन सुन्न करणारा घटनेचा थरार
crime news : एका फ्लॅटमध्ये व्यक्तीचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. सर्वत्र रक्त सांडलं असून रक्ताचे डाग फरशीवर पडले होते. ते दृश्य भयानक होतं. मात्र जेव्हा दुसऱ्या एका खोलीतील दृश्य पाहिले तेव्हा सर्वच लोक थक्क झाले. एक महिला पलंगावर पडलेली होती. तिच्या हातात मोबाईल फोन होता आणि ती मोबाइमध्ये मग्न होती, पुढे जे घडलं ते भयंकर होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
स्त्रीच्या पायांच्या विरुद्ध बाजूला रक्ताचे डाग
लहान मुल रक्ताच्या थारोळ्यात
पलंगावर पडलेल्या महिलेची ओळख समोर
Crime news : बंगळुरूच्या सव्वा चारशे किमी अंतरावर असणाऱ्या धारवाडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका फ्लॅटमध्ये व्यक्तीचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. सर्वत्र रक्त सांडलं असून रक्ताचे डाग फरशीवर पडले होते. ते दृश्य भयानक होतं. मात्र जेव्हा दुसऱ्या एका खोलीतील दृश्य पाहिले तेव्हा सर्वच लोक थक्क झाले. एक महिला पलंगावर पडलेली होती. तिच्या हातात मोबाईल फोन होता आणि ती मोबाइमध्ये मग्न होती, पुढे जे घडलं ते भयंकर होतं.
हे ही वाचा : “मविआ आंदोलनात आंतकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय”
स्त्रीच्या पायांच्या विरुद्ध बाजूला रक्ताचे डाग
एक लहान मुल पलंगाखाली पडले होते, अगदी त्याच स्त्रीच्या पायांच्या विरुद्ध बाजूला रक्ताचे डाग पडले होते. रक्ताने माखलेल्या व्यक्ती त्या महिलेचा नवरा होता. तसेच पलंगाखाली रक्ताने माखलेलं मुल हे त्याच महिलेचं होतं. अशा स्थितीत घरात तीन माणसे होती, मृत नवरा, मृत मुलगा आणि महिला होय. नवरा आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं, मात्र तिच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता किंवा प्रश्न नव्हता.
लहान मुल रक्ताच्या थारोळ्यात
अशातच घटनास्थळावर पोलीस अधिकारी आले त्यांनी लहान मुलाला पाहिलं असता, लहान मुलगा श्वास घेत होता. त्यांनी तत्काळपणे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी दुसऱ्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या प्रकरणात मुलाचे प्राण वाचले. पोलिसांनी तपास केला असता, बेडवर मोबाईलमध्ये पाहत झोपलेली महिला इन्सुलिन घेतलं होतं.
पलंगावर पडलेल्या महिलेची ओळख समोर
थोडक्यात काय तर मृत व्यक्ती हा महिलेचा नवरा होता, त्याची ओळख डॉ. किरण अशी समोर आली. तर पलंगावर पडलेल्या महिलेची ओळख डॉ. प्रियंका आहे. काही नातेवाईकांना त्यांना फोन केला आणि प्रियांकाने त्यांच्याशी खोटेच बोलले. पण डॉ. किरण खूप व्यक्तशीर होते. रुग्णालयातील त्याच्या सहकाऱ्यांना काहीतरी भलताच संशय आला होता, मग काही सहकारी त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा दरवाजा उघडाच होता. तेव्हा घरात पाहिले असता, विचित्र दृश्य त्यांच्या नजरेसमोर आले होते.










